WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sadi ladaki bahin लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sadi ladaki bahin आज आपण पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणींना मोफत साडी कशी मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे अर्ज कसा करायचा पात्रता असतील कोणत्या लाडक्या बहिणींना या मोफत साडे मिळणार आहेत कधी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात याचे वाटप होणार आहे या विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत.

Sadi ladaki bahin संपूर्ण माहिती

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे हे राज्यातील लाडक्या बहिणींना सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना लागू करता जसं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू केली आहे या अंतर्गत त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता राज्यातील महिलांना मोफत साडी देखील मिळणार आहे कोणत्या महिलांना मोफत साडे मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि नेमकी ती योजना कोणती आहे याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत

Sadi ladaki bahin राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र, होळी आणि गुढीपाडवा सण होऊन एक महिना उलटून गेला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यांतील लाभार्थींच्या हाती अद्याप साड्या पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे ही योजना अक्षय तृतीयेला प्रत्यक्षात उतरणार आहे.

राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती. दिंडोरी तालुक्यात १३ हजार १२७लाभार्थिनींसाठी साड्या ८ एप्रिल रोजी तालुका गुदामात दाखल झाल्या.

त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १७३ स्वस्त धान्य दुकानांपैकी ७३ दुकानांमध्ये ६ हजार ९५ साड्या वितरित करण्यात आल्या असून, उर्वरित १०० दुकानांमध्ये साड्या पोचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिली.

पेठ तालुक्यातील १० हजार ७८२ लाभार्थिनींसाठी ९ एप्रिल रोजी साड्यांचा साठा मिळाला आहे.सध्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोचवण्याचे काम सुरु असून लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे वाटप होईल, असे प्रशासनाने सांगितले.दरम्यान, होळी सणासाठी जाहीर केलेली साडी वाटप योजना प्रत्यक्षात महिनाभर उशिराने राबवली जात असल्याने लाडक्या बहिणींना होळीऐवजी अक्षयतृतीयेला ही साडी मिळणार आहे.

वणी येथे अंत्योदय योजनेचे ६६९ लाभार्थी आहे. त्यापैकी ६५० साड्या प्राप्त झाल्या आहेत. त्या लाभार्थींना २१ तारखेपासून धान्याबरोबरच वितरित करण्यात येणार आहे.
– दीपक गायकवाड, संचालक, स्वस्त धान्य दुकान, वणी
शासनाने होळी उत्सवाची भेट म्हणून मोफत साडी देणार असल्याचे जाहीर केले होते. आम्ही रेशन दुकानदाराकडे साडी आली का नाही याबाबत चौकशी करण्यासाठी वेळोवेळी चकरा मारल्या. आता महिना झाला तरी, भावाची लाडक्या बहिणीला साडी मिळेना.

साड्या पुरवठादार एजन्सीकडून ८ एप्रिल रोजी तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी प्राप्त झाल्या आहेत. त्या स्वस्त धान्य दुकानांना पोच करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांना साड्या लवकरात लवकर वितरित करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकान संचालकांना केल्या आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment