WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Account Rule सेविंगअकाउंट बाबत बँकेचे नियम बदलले ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


RBI Account Rule आज आपण पाहणार आहोत की सेविंग अकाउंट बाबत बँकेने काही नियम बदलले आहेत नेमके कोणते नियम बदललेत कशामुळे बदललेले आहेत आणि याचा ग्राहकांना आता काय फायदा होणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.

RBI Account Rule संपूर्ण माहिती


राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे बँकेत नेहमी आपल्या नियमामुळे मध्ये काही ना काही बदल करत असते यामध्ये आरबीआय आपल्या राज्यातील देशातील सर्व बँका चालवत असताना आरबीआयच्या बँक खाते मधील सर्व लक्ष असतात आणि त्यांनी वेळोवेळी सेविंग खात असतील एफबी संदर्भात नियम असतील व्यवहार असतील ट्रांजेक्शन असतील बँकेच्या सुविधा या सर्व आरबीआयच्या गाईडलाईनुसार चालतात आता आरबीआयने काही सेविंग खात्याबाबत नियम बदललेले आहेत हे सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे तर बघूया संपूर्ण माहिती

RBI Account Rule  लहान मुलांमध्ये आर्थिक जागरुकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) अल्पवयीन मुलांसाठी नवीन बँक खातं नियम २०२५ जारी केले आहेत. आता १० वर्षांवरील मुलंही स्वतंत्रपणे आपले बँक खातं ऑपरेट करू शकणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे नवे नियम १ जुलै २०२५ पासून लागू होतील. मुलांसाठी बँक खात्याचे नवे नियम काय आहेत, ही खाती कशी उघडायची, अटी व शर्ती काय आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) १० वर्षांवरील मुलांच्या बँक खात्यांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हे आहेत आरबीआयचे नवे नियम-

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची अल्पवयीन मुलं स्वतंत्रपणे आपलं बचत किंवा मुदत ठेव खातं उघडू आणि ऑपरेट करू शकतात.

१० वर्षांखालील मुलांच्या बँक खात्याचे नियम बदललेले नाहीत. त्यांचं बँक खातं पालक किंवा कायदेशीर पालक खातं उघडू शकतात.

अल्पवयीन मुलाचं बँक खातं उघडण्यासाठी मूल आणि पालक या दोघांचंही आधार, जन्माचा दाखला आदी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

आरबीआयच्या नव्या नियमानुसार १० वर्षांवरील मुलांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाणार नाही. परंतु बँका आपल्या धोरणानुसार मुलांना एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा देऊ शकतात.

मुलांचं बँक खातं कसं उघडाल?

सर्वप्रथम बँकेची निवड करा आणि बँकांमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधांची तुलना करा.

मुलांचं बँक खातं उघडण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करा. जसं की मुलाचं आधार कार्ड, जन्म दाखला, पालकांचं केवायसी दस्तऐवज इत्यादी.

तुम्ही मुलांचं बँक खातं ऑनलाइन किंवा ऑफलाइन उघडू शकता.

केवायसी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पालकांची इच्छा असेल तर ते मुलांसाठी व्यवहाराची मर्यादा ठरवू शकतात.

मुलांना काही बँकांमध्ये जास्तीत जास्त १,००,००० रुपये शिल्लक आणि किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. या खात्यांमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध नाही.

मूल १८ वर्षांचं झाल्यावर केवायसी अपडेट आणि स्वाक्षरी अनिवार्य आहे.

पालक नियमितपणे अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवू शकतात. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकतात.

मुलांना सुरक्षित बँकिंगचे नियम शिकवले पाहिजेत. पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बँक धारकांसाठी कोणते नियम बदललेले आहेत याविषयी आपण माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment