WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Education year यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये नाही तर जूनपासून सुरु होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Education year आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे यावर्षीचे नवीन जे शैक्षणिक वर्ष आहे ते एप्रिलमध्ये सुरू होणार का जूनमध्ये सुरू होणार अशा भरपूर काही चर्चा सुरू होत्या तर ते पूर्ण अपडेट बघितले आहे की ते आता जूनमध्ये सुरू होणार आहे जे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत

New Education year पूर्ण माहिती

विद्यार्थी जीवनात शिक्षक पालक या असतात आणि शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात त्यानंतर विद्यार्थी गावाला जातात परंतु आता यावर्षी नवीन एज्युकेशन पॉलीसी लागू करण्यात आली होती यामुळे आता यावर्षी एक एप्रिल पासूनच शाळा सुरू होणार त्या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या परंतु या बातम्या नंतर पूर्णविराम मिळालेला आहे यावर्षी अद्याप तरी एक एप्रिल पासून शाळा सुरू होणार नाही तर एक जून पासूनच यावर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती

New Education year यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून नव्हे, तर जूनपासूनच सुरू होणार आहे. सोबतच सीबीएसईच्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम तयार केला जात असून त्यासंदर्भातील अंमलबजावणी होणार असल्याची महिती शालेय शिक्षण विभाकडून देण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळाही सीबीएसईच्या धर्तीवर एक एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यात संभ्रम निर्माण झाला. याला राज्यातील शिक्षकांनी आता तातडीने हे कसे शक्य आहे, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

यावर शालेय शिक्षण विभागाने केलेल्या खुलाशानुसार शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार असून केवळ नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. या अभ्यासक्रमाची आखणी सीबीएसईच्या धर्तीवर केली असून हा बदल वगळता शाळांच्या वेळापत्रकात काहीही बदल झालेला नाही.

याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळांच्या वेळापत्रकात यंदा तरी असा कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. शिक्षण विभागाच्या राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिली आणि शक्य झाल्यास इयत्ता दुसरीसाठी एनईपी लागू करणे म्हणजेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवी पुस्तके आणि बदललेल्या पद्धतीने शिक्षण देणे हा बदल होणार आहे. तथापि, शाळा नेहमीप्रमाणे जून महिन्यातच सुरू होतील, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की नवीन वर्ष शैक्षणिक महाराष्ट्रात एक जून पासून सुरु होणार आहे जे संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment