Subsidy tactor yojana आज आपण पाहणार की राज्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ट्रॅक्टर घेण्यासाठी आता सरकार तुम्हाला दीड लाख रुपये देणार आहे यासाठी तुम्हाला काय करावे लागेल अर्ज कसा करावा लागेल याविषयी माहिती बघूया
Subsidy tactor yojana संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे सरकार नेहमीच नागरिकांना काही ना काही अनुदान देत असतं त्यांच्या फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा पीएमटीचा नियोजन असेल नमो शेतकरी योजना असेल त्याचप्रमाणे पीक विमा आता शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे जर त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांना जवळपास दीड लाख रुपये चा अनुदान मिळणार आहे हे कसं मिळणार याविषयी माहिती बघू
Subsidy tactor yojana राज्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची खरेदी केली तर त्यांना दीड लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खर्चात कपात व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे. वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. पण तुलनेने उत्पन्न मात्र तेवढं मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान दीड लाख रुपये इतके आहे.
सरकारची ही नवीन योजना काय आहे?
डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागात पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची सबसिडी देखील देणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने शेतीमध्ये नवीन क्रांती होईल. शेतकऱ्यांनी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केले तर त्यांना राज्य सरकार दीड लाख रूपयांची सबसिडी देखील देणार आहे. यासोबतच राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाईल.
प्रादेशिक परिवहन विभाग , ठाणे येथे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वाहन नोंदणीचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला.
नव नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण समृद्ध होत आहोत. आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे इंधनाची बचत होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल.
खर्च 60 ते 70 टक्क्यांनी कमी होणार
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्याने ऑपरेटिंग खर्च 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात नांगरणीसाठी 1500-2000 रूपये प्रति एकर खर्च येतो. पण इलेक्ट्रिक ट्रँक्टरने हा खर्च कमी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कसे मिळतील याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.