E pink riksha anudan आज आपण बनवती राज्यातील महिलांना सरकारकडून रिक्षा मिळणार आहे यासाठी काय करावे लागेल कोणत्या महिलांना मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे त्यांना कागदपत्र काय लागतील बघूयात माहिती
E pink riksha anudan संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी नेहमीच राज्य सरकार केंद्र सरकार त्यांचा विचार करत असतात महिलांना आर्थिक अनुदान देणे त्यामुळे त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह होण्यासाठी आता महिलांना रिक्षा मिळणार आहे या रिक्षाचा वापर करून ते स्वतःच आर्थिक स्थैर्य सुधारू शकतात तर बघुयात पूर्ण माहिती
E pink riksha anudan गरजू महिलांसाठी सरकारने एक सकारात्मक आणि सशक्त पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास विभागाच्या ‘ई-पिंक रिक्षा’ योजनेंतर्गत पुणे शहरातील तब्बल २,८०० महिलांना ई-रिक्षा देण्यात येणार असून, त्यांची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या योजनेचा उद्देश महिलांना स्वबळावर रोजगार मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
काय आहे ‘ई-पिंक रिक्षा’ योजना?
राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या या योजनेद्वारे घटस्फोटित, विधवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एकल महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. योजनेनुसार ई-रिक्षा खरेदीसाठी महिलांना आर्थिक मदत दिली जाईल
१) २०% अनुदान राज्य सरकारकडून
२) ७०% कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे
३) १०% रक्कम लाभार्थी महिला स्वतः भरणार
नोंदणीसाठी अट आणि प्रक्रिया
ई-पिंक रिक्षा मिळवण्यासाठी इच्छुक महिलांनी पुणे आरटीओमार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे. ‘पुणे आरटीओ’मार्फत ई-पिंक रिक्षा लाभार्थीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करताना महिला स्वतः रिक्षा चालवणार असल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.
या योजनेतील पात्रता ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. यात परिवहन अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी इत्यादींचा समावेश आहे.
अर्ज व पुढील प्रक्रिया
1. इच्छुक महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.
2. अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समिती करेल.
3. पात्र महिलांना कर्ज देणाऱ्या मान्यताप्राप्त बँका आणि रिक्षा एजन्सींची माहिती दिली जाईल.
4. १०% रक्कम भरल्यानंतर, उर्वरित कर्ज आणि अनुदान मिळवून रिक्षा संबंधित महिलेला वितरित केली जाईल.
रिक्षा चालवण्याची जबाबदारी लाभार्थीचीच
सरकारने स्पष्ट केलं आहे की ई-पिंक रिक्षा फक्त लाभार्थी महिलेकडूनच चालविली जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात पोलिस आणि परिवहन विभाग तपासणी करतील. जर ही रिक्षा पुरुष चालवीताना आढळली, तर कठोर कारवाई करण्यात येईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या महिलांना पिंक रिक्षा मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप telegram ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन डाउनलोड करा