WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST JOURNEY NEWS एसटी धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून ही सुविधा मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST JOURNEY NEWS आज आपण पाहणार की एसटी धारणासाठी कोणते आनंदाची बातमी येत आहे सरकारने एसटी महामंडळाने कोणता निर्णय घेतलेला आहे याबाबत आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत एसटी महामंडळासाठी नक्कीच हा मोठा निर्णय असू शकतो यामुळे आता एसटी जे प्रवासी आहे त्यांच्यासाठी खूपच हा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे तर कोणता निर्णय आहे बघूच संपूर्ण माहिती.

ST JOURNEY NEWS संपूर्ण माहिती

राज्यातील एसटी धारकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचा नेटवर्क महाराष्ट्राचं रस्ते लोहमार्ग जोडलेले एकमेव कारण म्हणजे आपलं एसटी महामंडळ आपल्या एसटीला आपण लाल परी देखील असे म्हणतो कारण खरच ती लाल परी आहे कारण गाव महाराष्ट्रातल्या कुठल्या पण गावात कोपऱ्यात एसटी जात असते आणि त्यामुळेच आपला प्रवास हा सुकर आणि सोयीस्कर होतो यामध्ये प्रवाशांना कुठलीही अडचण होऊ नये इजा होऊ नये यासाठी एसटी महामंडळ नक्कीच नेहमी सतर्क असते आणि आता राज्य सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एसटी महामंडळातील जे काही एसटी प्रवासी आहेत त्यांच्यासाठी खूपच हा चांगला निर्णय आहे तरी याच विषयाचे आपण माहिती घेणार आहोत या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण कशामुळे आहे बघूया संपूर्ण माहिती

ST JOURNEY NEWS एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नित्यनवीन बदल होत असून, आता प्रवासादरम्यान बस बिघडल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर उच्च दर्जाच्या, अगदी एसी बसनेसुद्धा पुढील प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी याबाबत माहिती दिली.

बिघाड झाल्यास थांबा नाही
रस्त्यात एसटी बस बिघडल्यास किंवा ओव्हरहिटिंग, चाक पंक्चर किंवा अपघातासारख्या कारणांमुळे प्रवास थांबला, तरी आता प्रवाशांना वाट पाहावी लागणार नाही. अशा वेळी त्या मार्गावर धावणाऱ्या कोणत्याही इतर बसमधून – मग ती हिरकणी, शिवशाही किंवा एसी व्होल्वो असो – प्रवास सुरू ठेवता येणार आहे.

वेळेची बचत होणार
उन्हाळ्यात गाड्या गरम होणे हे नेहमीचेच. अशा वेळी रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांना सूर्याच्या कडाक्यात ताटकळावे लागते. मात्र, नवीन निर्णयामुळे त्यांना थेट पुढील उच्च दर्जाच्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत तर होईलच, शिवाय मनस्तापही टळेल.

चालक-वाहकांची जबाबदारी झाली कमी
पूर्वी बस बिघडल्यास वाहक आणि चालकांवरच प्रवाशांना पुढे पाठवण्याची जबाबदारी असायची. आता महामंडळाने अधिकृतरित्या यावर व्यवस्था केल्यामुळे त्यांचाही तणाव कमी होणार आहे.

एसटीत आधुनिक सेवांचा समावेश
महामंडळाने साधी सेवा, निमआराम, वातानुकूलित, व्होल्वो एसी, भाडेतत्त्वावर एसी आणि यशवंती (मिडी) यासारख्या सेवा प्रकार प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. आता या सेवेचा अधिक परिणामकारक उपयोग करता येणार आहे.

प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद
हा बदल फारच स्वागतार्ह असून, काळानुरूप होत असलेला हा सुधारणा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. “ही योजना वेळेवर लागू झाल्यामुळे अनेकांचा त्रास कमी होईल,” असा विश्वास प्रवासी व्यक्त करत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या या नव्या निर्णयामुळे प्रवास अधिक सुलभ, सुसज्ज आणि वेळेत होणार आहे. तांत्रिक अडचणी आल्या तरीही प्रवाशांचा वेळ वाया जाणार नाही, ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एसटी धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment