WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Science Board Paper दहावी गणिताचा बोर्डाचा पेपर फुटला पेपर परत होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Science Board Paper आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्येच दहावी गणिताचा पेपर झाला परंतु राज्यात काही ठिकाणी गणिताचा पेपर फुटला यामुळे आता विद्यार्थी पालकांचा संताप वाढत आहे नेमका हा पेपर कुठे फुटला यावर बोर्डाने काय सांगितलेला आहे आणि हा पेपर परत होणार का? याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

SSC Science Board Paper पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बोर्डाच्या पेपर चालू आहेत यामध्ये पेपर गणिताचा झाला गणिताचा पेपर झाला आणि गणिताचा पेपर फुटला अशा प्रकारची बातमी आल्यानंतर विद्यार्थी पालकांमध्ये संताप वाढलेला आहे कारण याआधी मराठीच्या पेपर देखील भरपूर ठिकाणी फुटला होता व्हाट्सअप वर प्रश्न पत्रिका वायरल झाली होती त्यानंतर प्रशासनाने याची दखल देखील घेतली होती त्यानंतर सर्व पेपर व्यवस्थित चालू असताना आता परत गणिताचा पेपर झाला भाग दोन चा फुटला आहे त्यामुळे आता परत एकदा कॉपीमुक्त अभियान जे राज्य सरकारने बोर्डाने चालवलेला आहे त्याचा धुवा उडालेला आहे

SSC Science Board Paper गेल्या काही दिवसांपूर्वी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात दहावीचे पेपर फुटल्याची बातमी आली होती. त्यानंतर मोठा गदरोळही झाला होता. आता अमरावती जिल्ह्यात आज (७ मार्च) होणारा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील १०० मीटरच्या आत असणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर गणित पेपरच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.

दहावीचा गणिताचा पेपर असल्याने या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलिस पॅट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना जिजामाता शाळेच्यासमोर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये काही मुले दहावीच्या गणित पेपरच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स काढून घेऊन जाताना दिसले. त्या विद्यार्थ्यांना दुकानदारसुद्धा झेरॉक्स काढून कॉपी पुरविण्यामध्ये सहकार्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली.

पोलीस झेरॉक्स दुकानाजवळ गेले असता दुकानात जमा असलेले मुले पोलिसांना पाहून पळून गेली. दुकानाच्या आतमध्ये गेले असता एक व्यक्ती झेरॉक्स मशिनवर झेरॉक्स काढताना दिसला. काढलेल्या झेरॉक्सची पाहणी करून झेरॉक्स ही १० वीच्या गणिताच्या पेपरची उत्तरांची नक्कल असल्याचे दिसून आले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

अशाप्रकारे जर पेपर फुटत असतील तर हुशार मुलांनी काय करायचं हुशार मुलांनी भ्यास करायचा आणि पेपर लिहायचा आणि ह्या अशा प्रकारे इतर मुलं हे कॉप्या करून पास होत असतील तर हा एक प्रकारे हुशार मुलांवर चांगल्या मुलांवर अन्याय होत आहे अशा प्रकारे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे

यापूर्वीही जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात दहावीचे पेपर फुटले होते. यवतमाळमधील आदर्श विद्यालय कोठारीच्या केंद्रावर २२१ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यासाठी २२५ प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. उर्वरित चार प्रश्नपत्रिकांपैकी एक चोळामोळा केलेली आढळली. केंद्र संचालक तासके याने हीच प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून आले होते.

कॉपीमुक्त परीक्षेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील कोठारी आदर्श विद्यालयातून दहावीच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. उत्तरपत्रिका वाटप सुरू असतानाच ही प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यात आली होती. याप्रकरणात मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक श्याम तासकेंसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता

दहावी गणिताचा पेपर परत होणार का?

राज्यात अशा प्रकारचे पेपर फुटी घटना झाली आहे परंतु अदप देखील बोर्डाकडून किंवा सरकारकडून असं काही सांगण्यात आले नाही त्यामुळे पेपर परत होणार नाही .

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा पेपर गणिताचा फुटला याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment