WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे यामुळे विद्यार्थी पालक त्याच करणे संपूर्ण महाराष्ट्र देखील चिंतेत पडलेला आहे अत्यंत धक्कादायक बातमी आहे मुलांच्या परीक्षा विषय आणि परीक्षा झाल्यानंतर निकालाविषयी एक मोठी अपडेट धक्कादायक बातमी समोर येत आहे तर बघूया की संपूर्ण बातमी काय आहे

SSC HSC result 2025 पूर्ण माहिती

राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत बारावीच्या परीक्षा संपत आलेला आहे दहावीच्या परीक्षा चालू आहे यामध्ये आता जे काही पेपर झालेले असतात ते आता निकालाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विभागाकडे चेकिंग साठी पाठवलेले असतात त्याची गट्टे केलेले असतात आणि त्या विभागाचा जो प्रमुख असतो त्या त्या शिक्षकांना ते कट्टे हे चेक करायला देत असतो परंतु आता याच पेपराविषयी आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे यामुळे विद्यार्थ्यांनी बातमी अवश्य संपूर्ण वाचावी तर बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती.

धक्कादायक प्रकार घडला

SSC HSC result 2025 पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथे बारावीच्या उत्तरपत्रिका सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणी बोर्डाकडून नियमानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मुंबई विभागाच्या प्रभारी विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

बारावीच्या बुककीपिंग विषयाची परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी झाली होती. त्याच्या 25 उत्तरपत्रिका कामोठे बस स्टॉपच्या जवळ झाडीत टाकलेल्या आढळल्या. काही कामानिमित्ताने गुरुवारी (6 मार्च) सकाळी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल कामोठे बस स्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतुहूल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार आणि पनवेल महानगर अध्यक्ष स्वरुपा सुर्वे यांना सांगितली. त्यानंतर तिघींनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना सर्व माहिती दिली. कामोठे बस स्टॉपच्या मागे झाडात 25 उत्तरपत्रिका सापडल्या. यातील काही उत्तरपत्रिका फाटलेल्या होत्या. एका जेसीबीचालकाने काही मुलांना पेपर टाकताना पाहिले होते, अशी माहिती अदिती सोनार यांनी दिली.

कळंबोलीतील एका शिक्षकाकडे या उत्तरपत्रिका तपासायला आल्या होत्या. त्या शिक्षकाने बुधवारी (5 मार्च) कामोठे पोलीस ठाण्यात उत्तरपत्रिकेचा एक गठ्ठा (25 उत्तरपत्रिका) हरवल्याचे सांगितले होते. तसेच कुणी उत्तरपत्रिका घेऊन आल्यास आपल्याला कळवा, असेही सांगितले होते. ते तपासलेल्या उत्तरपत्रिका दुचाकीवरून मॉटरेटरकडे घेऊन जात असताना त्यांच्या पिशवीतून एक गठ्ठा पडल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना खात्री करावी

ज्या मुलांनी बारावीची परीक्षा दिली आहे त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या उत्तर पत्रिका सुरक्षित आहेत का, याची खात्री करावी. – अदिती सोनार, मनसे महिला अध्यक्ष, रायगड

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही

कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार याची काळजी घेतली जाईल. उत्तरपत्रिका तपासलेल्या होत्या. या प्रकरणी नियमानुसार कारवाई होईल. – ज्योत्स्ना शिंदे, प्रभारी विभागीय सचिव, मुंबई विभाग.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या उत्तर पत्रिका होत्या त्या बाहेर कुठेतरी पडल्या होत्या मग त्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका शिक्षकांनी चेक केला नव्हता आणि त्या जर भेटल्या नसल्या तर निकाल कसा लागला असता असं मोठं प्रश्न तयार होतोय आपल्याला काय वाटतं याबद्दल त्याचप्रमाणे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment