Ladaki bahin feb installment आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींचे हप्त्यांचे वितरण हे सुरू झालेले आहेत ते कोणत्या लाडक्या बहिणींना आजपासून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं त्याचप्रमाणे महिला बालविकास मंत्री काय म्हणाल्या बघुयात संपूर्ण माहिती.
Ladaki bahin feb installment पूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. अगदी कमी वेळात सर्वात जास्त लोकप्रिय होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील माता भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात याबाबत आता त्यांना हफ्त्यांचा वितरण भेटलेला आहे परंतु फेब्रुवारीचा हप्ता आणखीन पण भेटला नाही मार्च महिना आलेला आहे मात्र फेब्रुवारी मार्च आता कधी मिळणार असा प्रश्न भरपूर महिलांच्या धोक्यात आहे तरी एक मोठी बातमी समोर आलेली आहे.
Ladaki bahin feb installment महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हा विशेष डबल भेट म्हणून ७ मार्च २०२५ पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये जमा केले जातील.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर अधिकृत माहिती देत म्हटले आहे की, “महिला दिनानिमित्त सरकारने हा विशेष निर्णय घेतला असून, ७ मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा केला जाईल.”
लाडकी बहीण योजना: आतापर्यंतची प्रगती
‘लाडकी बहीण योजना’ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, आतापर्यंत सात हप्ते पात्र लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. आतापर्यंत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १,५०० रुपये प्रमाणे एकूण १०,५०० रुपये मिळाले आहेत. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये मिळणार असून, त्यानंतर आतापर्यंतची एकूण मदत १३,५०० रुपयांपर्यंत पोहोचेल. ये सातवा, आठवा आणि नववा हप्ता एकत्र झाल्यावर हि रक्कम मिळेल.
मुख्यमंत्री काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे की महाराष्ट्रातील ज्या काही माझ्या लाडक्या बहिणी आहेत या लाभापासून वंचित राहणार नाही आहेत प्रत्येक महिलांना त्यांचा लाभ मिळणार आहे अशा प्रकारे त्यांनी राज्यातील माता-भगिनींना आव्हान केले आहे
हप्ता वितरणाचे वेळापत्रक
५ ते ६ मार्च २०२५: हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल
७ मार्च २०२५ पर्यंत: सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात ३,००० रुपये जमा होतील
८ मार्च २०२५: महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांना आर्थिक मदत उपलब्ध असेल
२,१०० रुपये कधीपासून मिळणार?
महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजने’मध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार, सध्याच्या १,५०० रुपयांऐवजी पात्र महिलांना दरमहा २,१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. अनेक महिलांना या वाढीव रकमेची प्रतीक्षा आहे.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. एकदा हा निर्णय झाला की, महिलांना दरमहिन्याला २,१०० रुपये मिळतील. त्यामुळे लाखो महिलांचे लक्ष सध्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. या वाढीव रकमेविषयी लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक करायचे?
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत का हे तपासायचे असेल, तर खालील सोप्या पद्धती वापरू शकता:
१. बँक खाते तपासणी विविध पर्याय
ATM तुमच्या डेबिट कार्डद्वारे बॅलन्स चेक करा.
बँक पासबुक अपडेट जवळच्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करून खात्यात जमा रक्कम तपासा.
मेसेज/SMS तुमच्या बँकेने दिलेल्या मिस्ड कॉल क्रमांकावर कॉल करून SMS द्वारे बॅलन्स मिळवा.
नेट बँकिंग / मोबाईल बँकिंग अॅप तुमच्या बँकेच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा.
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून
अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करा.स्थिती तपासा
2)तुमच्या प्रोफाइलमध्ये जाऊन पेमेंट स्टेटस तपासा.
३. शासकीय मदत केंद्रावरून
स्थानिक मदत केंद्र तुमच्या गावातील किंवा शहरातील शासकीय मदत केंद्रात (अंगणवाडी, ग्रामपंचायत, नगर पालिका किंवा महानगरपालिका) येथे जाऊन लाडकी बहीण योजनेच्या पैशांची माहिती विचारू शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा