SSC rechaking form आज आपण दहावी बोर्डाचा परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये भरपूर मुलांना यश शालेय काही मुलांना अपयशाला असेल परंतु काही मुलं नापास झाले असतील कमी मार्क पडले असेल तर अशा वेळेस त्या मुलांनी काय करावे कोणता फॉर्म भरावे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
SSC rechaking form संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हा निकाल लावण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांना अपयश येत असतं त्या जीवनामध्ये त्यामुळे आपण काही काळजी करायची नसते कारण याला काही भरपूर पर्याय असतात पुरवण्या परीक्षा असते त्याचप्रमाणे आपल्याला रिचेकिंग रिव्होल्युशन अशा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात ते भरून आपण आपल्या पेपराचे पुनर पडताळणी करू शकतो याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण हे फॉर्म भरायचे असतात कुठे भरायचे असतात आणि याचा फायदा आपल्याला काय होणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती
SSC rechaking form राज्य मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (१३ मे) ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणी, पुरवणी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणीतीही माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन निकालानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यक सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.गुणपडताळणी-छायाप्रतीसाठी १४ ते २८ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच शुल्कही ऑनलाइन भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे, शुल्क भरणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरवणी परीक्षा अर्जांबाबत
राज्य मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला रिचेकिंग रेवोल्युशन फॉर्म कशाप्रकारे भरता येईल याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
SSC rechaking form 10वी बोर्डाच्या परीक्षेत कमी मार्क्स पडले नापास झालात तर हा फॉर्म भरा
Yes