WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Maths Part 2 IMP दहावी परीक्षाबाबत बोर्डाचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांचे चिंता वाढली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Maths Part 2 IMP आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाने काही निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत नेमका बोर्डाने कोणता निर्णय घेतलेला आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे हे आपण पाहूया

SSC Maths Part 2 IMP पूर्ण माहिती

राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये मराठीचा पेपर हिंदी इंग्रजी आणि गणित भाग एक याचा पेपर झालेला आहे आता येणाऱ्या पेपर हा गणित भाग दोन आहे त्यामुळे कुठेही काही गैरप्रकार होऊ नाहीत त्यमुळे बोर्डाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आहे परीक्षा बाबत परीक्षा पद्धतीत थोडे काही बदल केलेले आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्रोन बैठे पथक भरारी पथक त्याचप्रमाणे प्रत्येक पर्यवेक्षकांची संख्या आणि त्याचप्रमाणे पोलीस पथक यांची संख्या वाढवलेली आहे कारण येणारे पेपर आहे महत्त्वाचे आहेत मराठी पेपर इंग्रजी पेपर मध्ये काही ठिकाणी गैरप्रकार पेपर फुटी प्रकार घडला होता त्यामुळे ही दक्षता घेण्यात आलेली आहे

SSC Maths Part 2 IMP दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्रावजवळील 500 मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद

जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की बोर्डाच्या परीक्षेत कोणी गैरप्रकार केला किंवा कोणत्या केंद्रावर गैरप्रकार झालं तर त्या केंद्राची कायमची मान्यता रद्द होईल आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी घेण्यात दाखल करण्यात येणार आहे.

बैठ्याने भरारी पथक यांची संख्या वाढवणार

राजे दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत या बोर्डाच्या परीक्षांमध्ये आतापर्यंत परीक्षा केंद्र तालुका तालुका सोबत बैठे पथक भरारी पथक यांची संख्या वाढवणार आहेत यामुळे पुढील या पेपरांमध्ये गैरप्रकार होणार नाही.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एक मोठा निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे दहावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment