SBI BANK RULE 2025 आज आपण पाहणार आहोत की एसबीआय बँकेने काही नियम बदललेले आहेत यामुळे आता ग्राहकांच्या खात्यावर काय परिणाम होणार आहे त्यामुळे नियम फायद्याचे आहेत ते तोटे च कोणत्या सुविधा तुम्हाला भेटणार नाहीत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
SBI BANK RULE 2025 पूर्ण माहिती
भारतातील सर्वात विश्वसनीय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत भारतीय लोकांचा सर्व व्यवस्थित सुरळीत असे व्यवहार होतात जगाच्या कुठल्याही पातळीवर एसबीआय बँक ही सर्वात सुरक्षित आहे या बँकेच्या सुविधा भरपूर चांगले असतात बँक वेळोवेळी सर्व नियम अपडेट करत असते त्याचप्रमाणे ग्राहकांना सरकारी योजना आणि इतर बँकेच्या योजना मधून देखील चांगलं लाभ मिळत असतो आता या बँकेनेच काही नियम बदलल आहेत त्यामुळे तुम्हाला काही सुविधा मिळणार नाहीत तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती.
SBI BANK RULE 2025 देशभरातील आर्थिक व्यवस्थेसाठी अनेक बँका कार्यरत आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI देखील समाविष्ट आहे. सर्व बँका वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असतात. सध्या SBI आणि IDFC First Bank यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत, ज्यामुळे या बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. हे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. चला, या बदलांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यासोबतच काही आर्थिक नियमही बदलले जाणार आहेत, ज्यामध्ये सरकारतर्फे देखील काही नियम लागू केले जातील. त्याचबरोबर SBI आणि IDFC First Bank च्या ग्राहकांसाठीही नवीन नियम अंमलात येणार आहेत.या दोन्ही बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षापासून हे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ग्राहकांवर थेट परिणाम होईल. चला, हे नवीन नियम काय आहेत ते जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड युजर्सला मोठा धक्का
SBI आणि IDFC First Bank मधील जे ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करतात, त्यांना पुढील आर्थिक वर्षापासून या बँकांनी जारी केलेल्या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.आता या दोन्ही बँकांकडून Club Vistara Co-branded Credit Cards शी संबंधित नियम बदलण्यात येणार आहेत. या कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता अनेक सुविधांचा लाभ मिळणार नाही.
सध्या मिळत असलेले फायदे.
सध्या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेकडून Club Vistara SBI Credit Card वर 1.25 लाख रुपये, 2.5 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांच्या वार्षिक खर्चावर फायदा मिळत आहे.दुसरीकडे, Club Vistara SBI PRIME Credit Card वर दिली जाणारी प्रीमियम इकोनॉमी तिकीट वाउचर सुविधा बंद केली जाणार आहे.याशिवाय, नवीन आर्थिक वर्षापासून SBI Base Card चे वार्षिक शुल्क 1,499 रुपये आणि Prime Card चे शुल्क 2,999 रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, ग्राहकांना फी माफीचा पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध असेल.
IDFC First Bank करणार हे बदल
SBI प्रमाणेच IDFC First Bank देखील 1 एप्रिलपासून मोठे बदल लागू करणार आहे. तसेच, या बदलांनंतर इतर काही बँका देखील त्यांच्या Credit Card Users साठी नवीन नियम आणू शकतात.
IDFC First Bank कडून Club Vistara IDFC First Credit Card वर milestone ticket vouchers, renewal benefits आणि इतर अनेक फिचर्स बंद करण्यात येणार आहेत.
ही सुविधा मिळणार नाही
नवीन आर्थिक वर्षापासून SBI (State Bank of India) कार्ड ने आपल्या Club Vistara SBI Credit Card आणि Club Vistara SBI PRIME Credit Card शी संबंधित नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
1 एप्रिलपासून या कार्डांसाठी इकोनॉमी किंवा प्रीमियम इकोनॉमी तिकीट वाउचर उपलब्ध होणार नाहीत.31 मार्च 2026 पर्यंत मिळेल हा फायदाग्राहक 31 मार्च 2026 पर्यंत महाराजा पॉइंट्सचा लाभ घेऊ शकतील, कारण त्यानंतर एक वर्षात हे कार्ड पूर्णपणे बंद होईल.
याशिवाय, IDFC First Bank च्या Club Vistara Silver Membership चा फायदा देखील बंद होईल. या निर्णयाचा या दोन्ही बँकांच्या ग्राहकांवर मोठा परिणाम होईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एसबीआय बँकेने काही नियम बदललेले आहेत त्यामुळे आता ग्राहकांना या सुविधा मिळणार नाहीत याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्लेस्टोर वरून डाउनलोड करा