SSC MATHS BOARD PAPER 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाच्या परीक्षेविषयी बोर्डाने अचानक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता आहे कशामुळे तो निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेत आहोत दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाची बातमी आहे कारण बोर्डाने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे.
SSC MATHS BOARD PAPER 2025 पूर्ण माहिती
राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता बोर्डाने परीक्षा सुरू असताना समोरचा निर्णय घेतलेला आहे दहावी बोर्डाचे काही पेपर झालेले आहे काही पेपर आता बाकी आहेत महत्त्वाचे पेपर होणार आहेत त्यामुळे बोर्डाने अचानक हा निर्णय का घेतलेला आहे कशामुळे घेतलेला आहे याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे दहावी बोर्डाच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार मराठीचे पेपरात भरपूर ठिकाणी पेपर फुटला होता काही ठिकाणी तर प्रश्नपत्रिका whatsapp वर व्हायरल झाली होती याचीच दक्षता म्हणून बोर्डाने आता काही निर्णय बदलले आहेत आणि या पुढील परीक्षा या कॉपीमुक्त पार पाडणार आहेत.
SSC MATHS BOARD PAPER 2025इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी म्हणून पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आला होता. पण, शिक्षक संघटनांसह शिक्षक आमदारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तो निर्णय बदलला आहे. आता कोरोना काळ वगळून २०१८, २०१९, २०२० व २०२३ आणि २०२४ या काळातील परीक्षेवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळली, त्या केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक मात्र बदलण्याचा निर्णय बोडनि घेतला आहे.
बोर्डाच्या निर्णयानुसार आता कार्यवाही
परीक्षा केंद्रांसाठी सरमिसळ पद्धत यापूर्वीच अवलंबली असून आता केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची आदलाबदल करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार कार्यवाही होईल.
– औदुंबर उकीरडे, विभागीय सचिव, पुणे मंडळ
बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार…
२०१८, २०१९, २०२० व २०२३ आणि २०२४ या काळातील परीक्षेवेळी गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर दुसऱ्या
शाळांमधील केंद्र संचालक व पर्यवेक्षक नेमले जातील
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाईल
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष, त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शक तथा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करतील
• माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा काळात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत आहेत की नाहीत याची खात्री करतील
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाच्या परीक्षा दरम्यान बोर्डाने अचानक मोठा निर्णय घेऊन विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम निर्माण तयार केलेला आहे अशा सर्व लेटेस्ट अपडेटसठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर नक्कीच फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा