WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC study tips 2025 दहावी बारावी बोर्डाचा अभ्यास करताना या टिप्स फॉलो करा पडतील 90टक्के

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC study tips 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्डाचे पेपर हे सुरू झालेले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या टिप्स फॉलो करावे त्यामुळे त्यांचं चांगलं पेपर जाईल चांगले मार्क्स मिळतील याचीच माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC study tips 2025 पूर्ण माहिती

राज्यातील बारावी परीक्षा बोर्डाच्या सुरू झालेल्या आहेत आता दहावीच्या परीक्षाही दोन-तीन दिवसावर आलेले आहेत विद्यार्थी परीक्षेच्या काळामध्ये भरपूर तणावग्रस्त राहत असतात परंतु विद्यार्थ्यांनी तणावग्रस्त न राहता विद्यार्थ्यांनी आपलं मन प्रसन्न ठेवलं पाहिजे आपल्या विषयांचा कुठलाही दबाव न ठेवता अभ्यास केला पाहिजे आपण जो काही वर्षभर अभ्यास केलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून अभ्यास केला तर आपल्यावर आत्मविश्वास तयार होतो आणि याच आत्मविश्वासाचा वापर करून तुम्ही चांगला अभ्यास करू शकता.

SSC HSC study tips 2025परीक्षेचे दिवस नुकतेच सुरू झालेले आहेत. दहावी-बारावीच्या परिक्षांना सुरुवात झाली असून लवकरच पहिली ते दहावी आणि पदवीच्या अभ्यासक्रमांची परीक्षाही सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या घरोघरी अभ्यासाचे वातावरण आहे. परीक्षा जवळ आल्यामुळे मुलं मन लावून अभ्यासही करतात. पण सतत अभ्यास करून एक वेळ अशी येते की मुलं पुस्तक हातात धरून बसलेली तर असतात पण त्याचं आपण काय वाचतो आहोत हे अजिबात लक्षात येत नाही. अभ्यसात मुळीच मन रमत नाही. एकाग्र होत नाही अशी अडचण जर आलीच तर त्यासाठी पुढे सांगितलेले काही सोपे उपाय करून पाहा एकाग्रता वाढून पुन्हा अभ्यासात मन रमेल.

अभ्यास करताना मन एकाग्र होत नसेल तर काय उपाय करावे?

१. जर प्रयत्न करूनही अभ्यासात मन लागत नसेल तर थोडा वेळ ब्रेक घ्या. अर्धा ते पाऊण तासाचा हा ब्रेक असावा. यामध्ये चक्कर मारून या, थोडासा व्यायाम करा किंवा मग तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐका..
मित्रांशी गप्पा मारा किंवा मग एखाद्या बागेत जाऊन स्वच्छ, मोकळ्या हवेत बसा. असं काहीही केलं तर तुमचं मन पुन्हा रिफ्रेश होईल आणि अभ्यासात रमेल.

2)एकाच जागी अभ्यास करूनही कधी कधी मन रमत नाही. अशावेळी तुमची अभ्यासाची जागा थोडी बदलून पाहा. वेगळ्या खोलीत जाऊन बसा, टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये जा, अंगणामध्ये किंवा गच्चीवर जाऊन अभ्यास करून पाहा. थोडा बदल केला की मनावरची मरगळ कमी होते.

३)कधी कधी नुसतंच वाचून अभ्यासात मन रमत नाही. अशावेळी तुमच्या अभ्यासासंदर्भातले काही व्हिडिओ पाहा. आकृत्या पाहा. किंवा काहीतरी लिहून काढा. अभ्यासाचं माध्यम बदलल्यामुळेही खूप फरक पडतो.

४)अभ्यासातली एकाग्रता वाढविण्यासाठी काही वेळ डोळे मिटून बसा आणि दिर्घ श्वसन करत श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. यामुळेही मेंदू रिफ्रेश होण्यास मदत होते.

५) परीक्षेच अभ्यासाचा जास्त ताण घेऊ नये आपण जेवढा अभ्यास केलेला आहे त्याचा वेळोवेळी सराव करणार हे देखील गरजेचे आहे कारण तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे त्याचा जर सराव केला नाही आपण तर मग पूर्णतः आपला अभ्यास होणार नाही त्यामुळे आता नवीन काही करायच्य भानगडीत पडू नका जो आपला अभ्यास आहे त्याचा रिविजन व्यवस्थित करा.

तर वरील लेखनात आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत आपण कुठल्या टिप्स फॉलो केला पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगले मार्क मिळतील दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment