WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC chemistry imp 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा बाबत धक्कादायक बातमी विद्यार्थ्यांची चिंता वाढली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC chemistry imp 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा बद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे कुठली आहे काय आहे यामुळे विद्यार्थ्यांनो काय परिणाम होईल याचीच आपण माहिती घेणार आहोत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे

SSC HSC chemistry imp 2025 पूर्ण माहिती

राज्य दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे यातच आता एक मोठी अडचण समोर आलेले आहेत बोर्डाच्या परीक्षा आता पुढे होणार की नाही असं देखील एक परीक्षा प्रश्न होते कारण काही शिक्षक संघटना मी आता एक मोठी अडचण तयार केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या जर मागण्या मान्य केले नाहीत तर आम्ही परीक्षावर बहिष्कार टाकू नेमकं त्यांच्या मागण्या कुठल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परीक्षेवर काही परिणाम होईल का याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहूयात

राज्य सरकार (state government) जोपर्यंत 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, तोपर्यंत संपूर्ण राज्यभरात दहावी-बारावीच्या पेपर तपासणी बहिष्कार घातला जाईल, अशी भूमिका आमदार जयंत आसगावकर (MLA Jayant Aasgavkar) तसेच कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत विषय मंजूर करण्यात आला व त्याचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढण्यात आला. परंतु, ४ महिने झाले तरीही शासन याबाबत कोणतीही तरतूद करताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात हा निधी मंजूर होणे आवश्यक होते. पण राज्य सरकारने अद्याप याबाबत काहीही निर्णय घेतला नाही. येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनात १४ ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात सर्वच विधानसभा व विधानपरिषद मधील आमदारांनी तशी पत्रे सरकारला दिली आहेत.

यादरम्यान इयत्ता बारावीचे तपासणीसाठी आलेले पेपर कोल्हापूर बोर्डाकडे परत करण्यात आले आहेत. याशिवाय कोणत्याही प्रकारे पेपर तपासले जाणार नाहीत यावर सर्व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती ठाम असून यावर निर्णय घेतला जात नाहीत तोपर्यंत पेपर तपासले जाणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांना देण्यात आले. त्यावेळी आ.जयंत आसगावकर, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, शिवाजी घाटगे, भाग्यश्री राणे, रेश्मा सनदी, सचिन चौगुले, रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, भारत शिरगावकर, संतोष पाटील, सचिन पाटील, सावंता माळी यासह शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

आमदार काय म्हणाले

टप्प्यावरील आमचे शिक्षक गेले कित्येक वर्ष विनावेतन काम करत आहेत. आजपर्यंत त्यांचा टप्पावाढीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शासनाकडून केवळ चालढकल सुरू आहे. त्यामुळे टप्पावाढीचा आदेश जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत आमचा दहावी, बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार राहील तसेच भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.

  • जयंत आसगावकर, आमदार

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच आता काही शिक्षक संघटनाने त्यांच्याकडे ज्या काही मागण्या आहेत सरकारकडे त्या जर पूर्ण झाले नाहीत तर आम्ही परीक्षा आणि त्याचप्रमाणे पेपर चेकिंग वर बहिष्कार टाकणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी साठी हे चिंता वाढवणारी बातमी आहे आता सरकार याच्यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे आहे

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी-बारावी बोर्डा विषयी काही धक्कादाय बातमी होती ती आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा अथवा 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा व्हाट्सअप वर टेलिगम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment