SSC Hindi board paper 2025 पूर्ण माहिती
राज्यभर दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता पेपर फुटी प्रकरणीचे प्रकरण सारखे समोर येत आहे दहावीचा बोर्डाचा इंग्रजीचा पेपर झाला त्याचा पुढे हिंदीचा पेपर आहे तिचा पेपर हा सोमवारी होणार आहे बोर्डाने काही सदरचे पाऊल उचलले आहेत मराठी पेपर देखील भरपूर ठिकाणी फुटला जसे जालना असेल जळगाव असेल या ठिकाणी मराठीचा पेपर कुठला होता त्यानंतर बोर्डाने काही कठोर पावलं उचलले परंतु इंग्रजीचा पेपर देखील फुटला यामुळे विद्यार्थ्यांची पालकांची चिंता वाढलेली आहे नेमका हा पेपर कुठे फुटला आणि आता असा पेपर बाबत काय धक्कादायक बातमी बघूया संपूर्ण विश्लेषक माहिती
SSC Hindi board paper 2025 राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत.1 मार्च शनिवार रोजी इंग्रजीचा पेपर असल्याने शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दोन मुलांनी साडेअकरा वाजता इंग्रजीचा पेपर खिडकीतून घेऊन पलायन केले. पेपर फुटल्याची बातमी सर्वत्र चविने चर्चिली जात असतानाच पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत फोडलेला पेपर जमा करून घेतला आहे
बोर्ड परीक्षा मागील काही वर्षात धारूर शहरात शांततेत आणि व्यवस्थित पार पडत होत्या.परंतु यंदा सध्या सुरू असलेल्या एसएससी बोर्ड दहावीच्या 1 मार्च शनिवार रोजी होत असलेल्या इंग्रजी पेपर काही पोरांनी फोडल्याची घटना धारूर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर घडली. सदरील बाबीची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अवघ्या अर्ध्या तासात सीताफिने त्या पेपर फोडणाऱ्या पोरांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत पेपर उपलब्ध करून घेतला.
परंतु बोर्ड परीक्षा त्यातच इंग्रजी चा पेपर अर्धा ते पाऊण तासात फुटला असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे. धारूर तालुका शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे कार्यारंभशी बोलताना म्हणाले पेपर फोडणाऱ्या आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि सदरील पेपर फुटलेल्या प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली आहे.
धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे इंग्रजी विषयाचा दहावीचा पेपर पुढल्या प्रकरणी दोघा तरुणांना आम्ही ताब्यात घेतले आहे या पाठीमागे आणखीन साखळी आहे का? याचा सखोल तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
देविदास वाघमोडे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन धारूर
राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आह ज्या शाळा परीक्षा केंद्रावर अशाप्रकारे काही गैरप्रकार होईल त्या ठिकाणी त्या शाळेची किंवा परीक्षा केंद्राचे कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्यात त्याचप्रमाणे त्यांना मदत करत असतील त्यांना देखील कारवाई होईल अशा प्रकारे त्यांनी संकेत दिलेले आहेत
विद्यार्थी पालकांचा संताप वाढला
एकीकडे राज्यात परीक्षा सुरू आहेत भरपूर मुला अभ्यास करून पेपर लिहिता येत परंतु काही मुलं अशा प्रकारे पेपर फुटी करतात त्यामुळे त्या मुलांना पेपर सोपे जातात परंतु अभ्यास करणाऱ्या हुशार जे मुल आहेत त्यांच्यावर अशा प्रकारे अन्याय होत आहे अशा प्रकारे पालकांमधून सतत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाचा आणखीन एक कोणता पेपर फुटला याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा