Rule Changes From 1 February आज आपण पाहणार आहोत की उद्यापासून हा फेब्रुवारी महिना सुरू होत आहे यामध्ये आता काही महत्त्वाचे बदल होत आहेत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काय ना काही बदल होत असतात आता याच्या तुमच्यावर काय परिणाम होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत
Rule Changes From 1 February पूर्ण माहिती
फेब्रुवारी महिन्यात सुरुवात उद्यापासून होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या महिन्याला काय ना काही बदल होत असतो फेब्रुवारी देखील आता जवळपास मोबाईल रिचार्ज असतील सीएनजी पेट्रोल या सर्वांच्या किमतीत काय ना काही फरक होत असतो याची माहिती आपण घेणार आहोत पण तुमच्या खिशात कशाप्रकारे याचा परिणाम होणार आहे ते बघुयात
फेब्रुवारीपासून नवीन महिना सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याशिवाय नव्या महिन्यात काही नवे बदल होणार आहेत.
याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. पुढील महिन्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.
एलपीजीची किंमत – एलपीजीचे दर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात बदलले जातात. इंधन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती अपडेट करतात. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होणार की वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. कंपन्यांनी १ जानेवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात केली होती.
फेब्रुवारी महिन्यात अत्यंत कमी दिवस असतात यामध्ये देखील आता यावर्षी फेब्रुवारी महिना हा non leap असल्यामुळे जवळपास 29 दिवसाचा आहे यामध्ये आता तुम्हाला बघत येत आहे की कशाप्रकारे हे महत्त्वाचे बदल होत आहेत युपीए पेमेंट असेल त्यानंतर सिलेंडरच्या किमती असतील
युपीआय – युपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं काही यूपीआय व्यवहार रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रकही काढण्यात आलं होतं. हे नवे नियम १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. १ फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टरसह तयार करण्यात आलेल्या आयडीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, १ फेब्रुवारीपासून ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स (अक्षरं आणि अंक) वापरले जातील. स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल.
बँकिंग नियम – कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या ग्राहकांना आपल्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमध्ये आगामी बदलांची माहिती दिली आहे. हे बदल १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. यामध्ये मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेत सुधारणा आणि विविध बँकिंग सेवांसाठी अपडेटेड शुल्काचा समावेश आहे.
ATF चे दर – एअर टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) दरात १ फेब्रुवारीपासून बदल होण्याची शक्यता आहे. इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधन आणि टर्बाइन इंधनाच्या किंमतीत सुधारणा करतात. म्हणजेच १ फेब्रुवारीला त्यांच्या किमतीत बदल झाला तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.
मारुतीच्या कार – देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (एमएसआयएल) वाढत्या इनपुट कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्टची भरपाई करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आपल्या मॉडेल्सच्या किंमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल्टो के १०, एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा, अर्टिगा, इको, इग्निस, बलेनो, सियाज, एक्सएल ६, फ्रँक्स, इनव्हिक्टो, जिम्नी आणि ग्रँड व्हिटारा या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होणार आहे.
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की फेब्रुवारी महिन्यात कशाप्रकारे काय बदल होणार आहे त्याचा परिणाम आपल्यावर काय होणार आहे आमच्या सर्व अपडेट साठी नक्कीच तुम्ही टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.