Rain news maharashtra आज आपण पाहणार आहोत की राज्यात पुढील पाच दिवस कोणत्या जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊस पडणार आहे राज्याच्या कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी आणि हा पाऊस किती वेळ असणार आहे कोणत्या दिवशी पडणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.
Rain news maharashtra संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे हवामान खात्याने आत्ताच एक दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुढील पाच दिवस या जिल्ह्यांमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस पडणार आहे तुम्हाला माहित आहे पाऊस हा वेळेवर पडला तरच शेतकऱ्यांना त्याचा उपयोग असतो परंतु शेतकरी ज्यावेळेस पीक घेत असतो त्याचा पिकाचं उत्पन्न होत असतो त्याची वाढ होत असल्याने त्याच वेळी जर पाऊस पडला तर शेतकऱ्याचा भरपूर मोठा नुकसान होत असतं त्यामुळे शेतकरी नेहमी निराश होत असतो त्याचप्रमाणे राज्यातील जे वीट कामगार असतील त्यांच्या विठाच्या भट्ट्या असतात मातीचे भांडे बनवणारे लोक असतात यांना देखील त्या अवकाळी पावसाचा अचानक पाऊस आल्यामुळे फटका बसतो त्यामुळे आता आपण आज बघणार की राज्यातील कोणत्या भागामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत
Rain news maharashtra राज्यातील हवामानामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या राज्यात तापमानातही मोठी वाढ झाली आहे. अकोल्यात सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अमरावतीत ४३ अंश सेल्सिअस तापमान आहे. विदर्भातील बहुतांश भागांत तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे.
कोकणातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्ण व दमट हवामान राहणार आहे. मात्र, शुक्रवारपासून हवामान कोरडे राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आज, तर परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उद्या व शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून रविवारी दरम्यान हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. या भागांमध्येही विजा व गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा