PMEGP loan process आज आपण पाहणार आहोत की केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास दहा लाखांपर्यंत खर्च मिळणार आहे हे कर्ज कोणाला मिळणार यासाठी कागदपत्र काय लागतील अर्ज कुठे करावा लागेल या संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
PMEGP loan process पूर्ण माहिती
समाजात जगत असताना प्रत्येकाला काहीना ना काही आर्थिक अडचण असते ही आर्थिक अडचण त्याला दूर करण्यासाठी तू बँकेतून लोन घेतो अन्यथा कोणाकडून तरी कर्ज घेत असतो किंवा नातेवाईकाकडून उसने पैसे घेत असतो तर अशा प्रकारे आपण पाहतो की आपल्याला व्यवसाय करण्यासाठी कधी आपण घर घेतलं छोटा मोठा उद्योग केला तरी आपल्याला पैसे लागतात त्यावेळेस कितीला आपल्याला कर्ज अथवा लोन हे करावे लागेल मग अशा वेळेस आपल्याला की पैसे कुठून मिळते तर तुम्हाला माहिती आहे का केंद्र सरकारची अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला उद्योग करण्यासाठी दहा लाखापर्यंत देखील कर्ज मिळू शकत याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
PMEGP loan process केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister Employment Generation Program) योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्ड या कार्यालयामार्फत ग्रामीण भागामध्ये व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी व ग्रामीण भागात केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या हाताला काम मिळावे. स्वतःचा उद्योग करता यावा, यासाठी नाममात्र व्याजदरावर कर्ज देण्याचे काम ही योजना करते.
PMEGP अंतर्गत कर्जासाठी काय लागता कागदपत्रे पासपोर्ट साईजच्या फोटोसह योग्यरित्या भरलेला अर्ज प्रकल्प अहवाल अर्जदाराची ओळख आणि पत्त्याचे पुरावे अर्जदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड किमान आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र विशेष श्रेणी प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास उद्योजक विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र SC/ST/OBC/अल्पसंख्याक/माजी सैनिक/PHC साठी प्रमाणपत्र शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र, असल्यास बँक किंवा NBFC द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज PMEGP ई-पोर्टल अर्जदारांना PMEGP नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
https://www.kviconline.gov.in/pmegp.jsp येथे अर्ज ऑनलाइन भरून आणि सबमिट करून प्रवेश प्रदान करते.
कर्ज परतफेडीचा किती असतो कालावधी कर्ज परतफेडीचा कालावधी 3 ते 7 वर्षापर्यंतचा असतो. बँक कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे असतो. कर्ज मंजूरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्याने संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण घेतलेले पाहिजे. लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप केल्यानंतर नोडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी केस पाठविले जाते. त्यानंतर अनुदानीत अमाऊंट नोडल बँकेकडून कर्ज देणाऱ्या बँकेस वितरीत करण्यात येते. वितरीत करण्यात आलेले अनुदान लाभार्थीचे नावे 3 वर्षाकरिता टर्म डिपॉझिट रिसीटमध्ये डिपॉझिट करण्यात येते. तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर अनुदानीत रक्कम कर्ज खात्यात पाठवली जाते. याप्रकारे लाभार्थीस त्याच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करण्यात येते.
PMEGP योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी PMEGP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp ऑनलाइन PMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा, तुमच्या माहितीनुसार सर्व आवश्यक तपशील भरा सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, भरलेले ट्रॅक सेव्ह करण्यासाठी ‘सेव्ह अॅप्लिकंट डेटा’ वर क्लिक करा. तुम्ही तुमचा डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या अंतिम सबमिशनसाठी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील अर्ज पूर्ण झाल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड त्याच्या/तिच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल.
PMEGP योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्याची ऑफलाईन स्टेप
अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर, अर्ज मसुदा म्हणून जतन करा.
अर्जाची प्रिंटआउट घ्या.
अर्जाची प्रिंटआउट जवळच्या कार्यालयात जमा करा.
संबंधित बँकेने केलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करा
या योजनेचे वैशिष्टये काय आहेत 25 लाखांपर्यंत गुंतवणुकीचे उद्योग तथा 10 लाख पर्यंतच्या व्यवसाय सेवा घटक प्रकल्पांना 90 ते 95 टक्के कर्ज राष्ट्रीयीकृत बँका तथा विभागीय ग्रामीण बँका, आयडीबीआय मार्फत उपलब्ध होते. उर्वरित 5 ते 10% रक्कम अर्जदारास भरावी लागते. एकूण कर्जापैकी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के मार्जिन मनी अनुदान प्राप्त होते. विशेष गटातील उमेदवाराला शहरी भागात 25 टक्के व ग्रामीण भागात 35 टक्के मार्जिन मनी अनुदान प्राप्त होते. विशेष गटात अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्यांक, महिला, अपंग उमेदवार, माजी सैनिक यांचा समावेश होतो. वय अठरा वर्षे पूर्ण असलेला उमेदवार पात्र असून उत्पन्नाची अट नाही. तथापि ५ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीचे व्यापार सेवा घटकासाठी, तसेच १० लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या उद्योग प्रकल्पासाठी शिक्षण आठवी वर्ग पास अन्यथा शिक्षणाची अट नाही.
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची उदिष्ट्ये
स्वयं रोजगाराच्या नव्या उद्योगांमार्फत/परियोजनातून/सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांबरोबरच ग्रामीण क्षेत्रात देखील रोजगाराची हमी देणे.
पारंपारिक/ ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना व्यापक स्वरुपात एकत्र आणणे आणि त्यांना यथासंभव त्यांच्या जागेतच स्वयंरोजगार मिळवून देणे.
पारंपारिक/ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी आणि टिकाऊ असा स्वयंरोजगार देणे, जेणेकरुन त्या गावातील तरुण लोक शहराकडे जाणे टाळतील.
पारंपारिक कामगारांची पैसे मिळविण्याची क्षमता वाढविणे. तसेच ग्रामीण आणि शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करणे, त्यांच्या विकासाला चालना देणे.
पीएमईजीपी योजनेंतर्गत या व्यवसायांना दिले जाते कर्ज
कृषी आधारित अन्न प्रक्रिया
वन-आधारित उत्पादने
हाताने तयार केलेला कागद आणि फायबर
खनिज-आधारित उत्पादने
पॉलिमर आणि केमिकल-आधारित उत्पादने
ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायो-टेक
सेवा आणि वस्त्र
अशाप्रकारे आपण पाहिलं केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेद्वारे आपल्याला दहा लाखापर्यंत कर्ज मिळेल यासाठी काय प्रोसेस आहे याची पूर्ण माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा