PM Kisan hafta आज आपण पाहणार आहोत की आपल्या खात्यावर दोन हजार रुपये कोणाच्या खात्यावर जमा होणार आहेत कशाप्रकारे होणारे त्यासाठी आपल्याला काय करायचंय अर्ज कुठे करायचा आहे ऑनलाइन किंवा ऑनलाइन पात्रता काय असणारे हे दोन हजार रुपये आपल्याला कशामुळे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
PM Kisan hafta पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी देशभरातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये उद्या जमा होणार आहे हे दोन हजार रुपये हे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजना अंतर्गत मिळणार आहेत या योजनेचे अंतर्गत राज्यातील देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाचे 6000 रुपये मिळतात त्याचा हा टप्पा आहे दोन हजार रुपये असे करून तीन टप्प्यामध्ये सहा हजारांचे वितरण होत असते
राज्य सरकार नमो किसान योजना
देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी 6000 देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजना सुरू केली आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने नमो किसान योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळत आहेत असे मिळून एकूण वर्षाचे 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात
PM Kisan hafta: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत देशातील शेतकर्यांना पीएम किसान योजनेचे 18 हप्ते (36000 रुपये) मिळाले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्त्याचं वितरण सोमवारी (24 फेब्रुवारी) केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम बिहारमध्ये पार पडणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर 2024 ते मार्च 2025 कालावधीतील 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) दुपारी दोन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास बिहारमधील भागलपूर या ठिकाणी असलेल्या समारंभात वितरित होणार आहे. त्यातून राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1 हजार 967 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आलेली आहे.
बिहारमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नागपूर येथून सहभागी होणार आहेत. राज्यामध्ये सर्वदूर कृषी विभाग, महसूल व वने विभाग, ग्राम विकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यावेळी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. बिहार राज्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केंद्र सरकारच्या https://pmindiaweb-cast.nic.in या लिंकवरून पाहता येणार आहे. या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
पीएम किसानचे 2000 रुपये खात्यात येण्यासाठी काय करावं?
ई केवायसी करा – पीएम किसान सन्मान निधी योजनेतील 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात विना अडथळा जमा व्हायचे असल्यास ई केवायसी करणे आवश्यक आहे.
अॅग्रीस्टॅक नोंदणी करा – शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे.
फार्मर आयडी मिळवा – अॅग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळेल.
जमीन पडताळणी करा – पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे.बँक खाते डीबीटी सुरु करा – शेतकऱ्यांचं बँक खाते डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर) पर्याय सुरु असलेले असावे.
18 वा हप्ता – पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.
ई केवायसी कसं करा – ई केवायसी फोनवरून किंवा सीएससी केंद्रावरून पूर्ण केली जाऊ शकते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या नागरिकांना हे दोन हजार रुपये मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा काही बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा