Mofat shikshn mulina आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागेल कागदपत्र कोणते लागतील अर्ज कसा करावा लागेल त्याचप्रमाणे त्यांना मोफत शिक्षण मिळवण्यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल या विषयांची माहिती आपण पाहणार आहोत.
Mofat shikshn mulina संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागला त्यानंतर आता मुलांचा ओघ हा प्रवेश प्रक्रियेकडे असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का राज्य त्यांनी मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार आहे या संदर्भात एक मोठी बातमी आहे महाराष्ट्राची उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो जीआर काढलेला आहे त्यानुसार राज्यातील मुलांना मोफत शिक्षण मिळतं. या अंतर्गत कोणते कोर्सेस येतात आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते जेणेकरून आपल्याला हे मोफत शिक्षण मिळेल याविषयी आपणास संपूर्ण माहिती मिळवणार आहोत.
Mofat shikshn mulina राज्यातील गरीब व गरजू मुलींच्या शिक्षणासाठी (Education) राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय 8 जुलै 2024 रोजी परिपत्रक काढून घेतला होता. त्यावेळी हा निर्णय निवडणुकींच्या अगदी तोंडावर होता. या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. ती योजना म्हणजे मुलींना 100% शैक्षणिक शुल्क माफ करण्याची. ही योजना अत्यंत चांगली आहे. त्यामागील राज्यकर्त्यांचा हेतूही स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण 50% असायला हवे, असा उद्देश होता. सध्या ते प्रमाण 36% आहे. सर्व जाती-प्रवर्गांतील मुलींना लाभ देणारी ही योजना आहे. पण या योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची आणि शैक्षणिक संस्थांची (College) इच्छाच नसल्यासारखी वाटते. प्रथमदर्शनी तरी तसंच चित्र दिसतं. हे या योजनेचं पहिलंच वर्ष आहे, कल्पना आहे, पण या योजनेचे काही बारकावे आपण समजून घेणे आवश्यक आहे. यातील वास्तव राज्यकर्त्यांपुढे येणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना मूळतः फक्त पदवी शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आहे. त्यामध्ये केवळ व्यावसायिक कोर्स करणाऱ्या 543 अभ्यासक्रमांनाच या योजनेचा लाभ मिळतो. काही अभ्यासक्रमांची भर घालण्यात आलेली आहे. मात्र, खासगी व अभिमत विद्यापीठांमध्ये शिकत असाल तर या योजनेचा लाभ मिळत नाही. उत्पन्न 8 लाखांच्या आत असावे, हा निकष आहे. पदव्युत्तर कोर्सला प्रवेश घेतला असल्यास याचा लाभ मिळत नाही. तसेच तुम्ही याव्यतिरिक्त कोणतीही शासकीय शिष्यवृत्ती घेत असाल, तर फक्त एकाच योजनेचा लाभ घेणे बंधनकारक आहे.
या योजनेसाठी वेगळी अर्ज प्रक्रिया नाही. आपण नेहमी ज्या पद्धतीने शिष्यवृत्तीचा अर्ज करतो, त्याच प्रकारे अर्ज भरायचा असतो. प्रवेशाच्या वेळीच या योजनेचा लाभ मुलींना मिळाला, तरच त्याचा खरा फायदा होतो. अन्यथा शैक्षणिक संस्थांचे अधिकारी सर्वप्रथम संपूर्ण शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावतात आणि वसुली करतात. “नंतर परतावा दिला जाईल” असे सांगून वेळ मारून घेतात. परिणामी पालक व विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो. परीक्षा देण्यासाठी संपूर्ण शुल्क भरले असेल, तरच विद्यार्थिनींना परीक्षेला बसू दिले जाते. अर्ज प्रक्रियेची गुंतागुंत असल्याने अनेक मुली अर्ज भरणे टाळतात. जर सुरुवातीसच या योजनेचा लाभ दिला गेला, तर लाखो मुलींना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मात्र, “आधी फी भरा, नंतर परतावा मिळेल” असे म्हटले जाते, तेव्हा समजावे ही योजना केवळ कागदोपत्री आहे. सध्या दहावी-बारावीचे निकाल लागले आहेत. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तरीही या योजनेबाबत प्रशासन वा शैक्षणिक संस्था कोणतीही प्रसिद्धी करताना दिसत नाहीत. कुठेही कॅम्पस किंवा प्रसारमाध्यमांतून जाहिरात लावलेली नाही. पालक संभ्रमात आहेत. कोणीही माहिती देत नाही, काय करावे हे त्यांना सुचत नाही.
वर्षभरात केवळ 5720 मुलींचेच अर्ज पात्र
दुसरी बाजू अशी की, सामाजिक क्षेत्रातील काही संस्था मुलींना शैक्षणिक फी माफ झालेली आहे असे समजून मदत करण्यास नकार देत आहेत. यामुळे विद्यार्थिनींची कोंडी झाली आहे. मागील शैक्षणिक वर्षात या योजनाबाबत माहिती घेतली असता, उच्च शिक्षण विभागाने केवळ 5720 मुलींचेच अर्ज पात्र ठरवले असल्याचे सांगितले. तरीही अद्याप फी परतावा झालेला नाही. या योजनासाठी शासन दरवर्षी 905 कोटींची तरतूद करणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. मात्र, समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. विद्यार्थिनी केंद्रबिंदू ठेवून या प्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व समाविष्ट केल्यासच ही योजना गरजूंपर्यंत पोहोचू शकते. अन्यथा आपण केवळ कोट्यवधींचे आकडे वाचत राहू, आणि मुलींची शैक्षणिक अवस्था ‘जैसे थे’ राहील.
अशाप्रकारे आपण पहिले राज्यातील कोणत्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन क्वेश्चन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा