SSC HSC reexam date आज आपण पाहणार की राज्यातील दहावी बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे नेमक्या परीक्षा कोणत्या तारखेपासून सुरू होतील कोणत्या तारखेला संपतील त्याचप्रमाणे दहावी बारावीचे वेळापत्रक काय असेल याची माहिती आपण आज पाहणार आहोत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर बघुयात की पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक संपूर्ण.
SSC HSC reexam date संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी यश आलं काही विद्यार्थ्यांना अपयश आले परंतु आता ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आता परत फेरपरीक्षा देता येते या फेरपरीक्षा म्हणजेच पुरवणी परीक्षा या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक काय असणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत आणि पुरवणी परीक्षेला बसून आपल्याला परत पास होऊन पुढील प्रवेश प्रक्रियेत देखील ऍडमिशन घेता येतो त्यामुळे पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक आलेला आहे पुरवणी परीक्षा कधी सुरू होणार आणि कधी संपणार याविषयी आपण संपूर्ण माहिती बघुयात
SSC HSC reexam date महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत तर दहावीची परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत घेतले जाणार आहे.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती,नाशिक, लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत जून-जुलै 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भेट देऊन वेळापत्रक पाहू शकतात.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी राज्य मंडळातर्फे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छापील छापलेले किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असेही आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
अशाप्रकारे आपण पहिले राज्यातील 10 वी 12 वी विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा