WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat shikshan scheme या विद्यार्थ्यांना आजपासून मोफत शिक्षण मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat shikshan scheme राज्यातील विद्यार्थ्यांसाठीही आपण मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना आज पासून मोफत शिक्षण मिळणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी त्यांना काय करावे लागेल दहावी बारावीचा निकाल नुकताच लागलेला आहे त्यानंतर आता पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे याचाच हा निर्णय झालेला आहे तर बघूया संपूर्ण माहिती…

Mofat shikshan scheme संपूर्ण माहिती


राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये शिक्षण घ्यायचं असते शिक्षण घेऊन चालणे नोकरी मिळवायचे असते परंतु शिक्षण घेण्यासाठी त्यांना काही आरती अडचणी असतात ही आता आर्थिक अडचण राज्य सरकारने दूर केलेल्या राज्य सरकार आता  मुलींना मोफत शिक्षण देत आहे हे तर आपल्याला माहिती आहे परंतु आता या खुल्या वर्गातील मुलांना देखील आता मोफत शिक्षण मिळणार आहे नेमक्या कोणत्या कुलावर्गाचा समावेश आहे आणि यांना कोणते कोणते शिक्षण मोफत मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते अशा मुलांसाठी नक्कीच हा लेख महत्त्वाचा आहे तर तुम्ही नक्कीच याला शेअर करा बघुयात संपूर्ण माहिती.

Mofat shikshan scheme समाजातील दुर्बल व मागास जातींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबविते. त्यासाठी प्रशिक्षण संस्था पण सूरू करण्यात आल्या आहेत. पण अन्य घटक पण आर्थिक दुर्बल असतात म्हणून त्यांनाही मोफत शैक्षणिक प्रशिक्षण मिळावे, असा हेतू ठेवून आता उपक्रम आला आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या नामांकित संस्थेचा यात पुढाकार आहे. औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील ईच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे खास खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आहे. त्यात ब्राम्हण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगुथर, बनिया, राजपुरोहित, नायर, अय्यनगार, नायडू, पाटीदार या जातीतील विद्यार्थ्यांना संधी आहे. त्यात कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळातर्फे योजणांचा लाभ मिळत नाही, अश्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. अर्जदार लक्षित गटातील असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८लाख रुपयाच्या आंत असावे. विद्यार्थी हा अभियांत्रिकी पदवीधारक ( आयटी, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉमुनिकेशन, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अथवा बीएससी, बिसए, बीसीएस, एमएससी संगणक विज्ञान, एमसीए पदवी उत्तीर्ण असावा. अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.

अर्ज करतांना काही कागदपत्रे अपेक्षित आहेत. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र तसेच अमृत लक्षित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा. ८ लाख रुपयाखालील उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

एनआयईएलआयटी संस्थेच्या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमृत संस्थेच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करण्याची सूचना आहे. संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील योजना या टॅबमध्ये जात एनआयईएलआयटी प्रशिक्षण योजना या बटणावर क्लिक करीत अर्जाची नोंदणी करता येईल.

टपालाने किंवा ई मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जाहिरात रद्द किंवा मुदतवाढीबाबत तसेच अर्ज नाकारणे व स्वीकारणे, निवडीची पद्धत बदलणे याचे सर्व अधिकार अमृतच्या व्यवस्थापकीय संचालक यांना राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. अर्ज सादर करतांना कोणत्याही अडचणी आल्यास अमृतच्या मेलवर किंवा ९७३०१५१४५० या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याची सूचना आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.

Leave a Comment