WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission timetable अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक बदलले विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission timetable आज आपण पाहणार आहोत अकरावी प्रवेशाची वेळापत्रक बदललेले आहेत या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यानुसार आता वेळापत्रक देखील बदललेल्या आहेत ते बघूया संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.

11th addmission timetable संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात यावर्षी दहावी बोर्डाचा निकाल लवकर लावला निकाल लावल्यानंतर लगेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पण सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे तीन दिवस ही वेबसाईट बंद होती परत ती वेबसाईट सुरू करण्यात आली त्यानंतर पार्ट वन पार्ट टू असे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जातात राज्यात यावर्षी सर्वत्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व्हावी यासाठी सरकारने शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत परंतु अध्याप देखील सर्वर मध्ये काही ना काही अडचण येत आहे त्यामुळे आता नवीन सुधारित वेळापत्रक अकरावीच्या मुलांना मिळालेले आहेत शासनाकडून वेळोवेळी त्याच्या सर्व सूचना देण्यात येत आहेत त्या संदर्भात काही हेल्पलाइन नंबर देखील देण्यात आलेले आहेत याविषयी आपणास संपूर्ण माहिती बघणार आहोत.

11th addmission timetable अकरावी प्रवेशाची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! शिक्षण विभागाने FYJC प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आता तुम्हाला तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

१९ मे रोजी ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टल सुरु करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकांना सरावासाठी हे पोर्टल उपलब्ध करून दिले होते. या दरम्यान, राज्यभरातील पालक, विद्यार्थी, अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांकडून अनेक महत्त्वाच्या सूचना मिळाल्या. या सूचनांचा समावेश करण्यासाठी तांत्रिक बदल करण्याची गरज होती. ती आता पूर्ण झाली आहे.

विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार
जरी अर्ज भरण्याची प्रक्रिया काही प्रमाणात लांबणीवर पडली असली तरी, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि पसंतीक्रम नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पोर्टल पूर्णपणे निर्दोष आणि उत्कृष्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाइन दर्शवली जाईल आणि विद्यार्थ्यांना ई-मेल तसेच मोबाईल संदेशाद्वारे याची माहिती दिली जाईल. अपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या अर्जांना परवानगी देण्याऐवजी, एक परिपूर्ण आणि त्रुटीरहित पोर्टल सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

 11 वी ऑनलाईन ॲडमिशन सुरू! आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी!काळजी करू नका, सर्व मदत उपलब्ध
शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी गोंधळून जाऊ नये. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोयीची आणि कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ, योग्य सोयी-सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.

या प्रक्रियेची व्यापक प्रसिद्धी व्हावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालक https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा support@mahafyjcadmissions.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतात. मदतीसाठी ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क साधता येईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं का अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोणत्या बदल याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment