Income tax job recruitment आज आपण पाहणार आहोत की आयकर विभागांमध्ये मोठी भरती निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा पगार किती असेल कागदपत्र कोणती लागतील या संपूर्ण विषयाची आपण माहिती या लेखनात घेणार आहोत
Income tax job recruitment पूर्ण माहिती
देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरीत आहे आयकर विभागात नोकरी निघालेली आहे पगार देखील लाखाच्या पार आहे त्यामुळे आता ही संधी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नोकरी मिळवणे हे खूप चांगलं स्वप्न असतं कारण नोकरी मिळाली तर आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित करता येतं आणि एक आपलं सुखी समृद्ध जीवन आपण जगू शकतो तर अशातच तुमच्यासाठी आयकर विभागात नोकरी निघालेली आहे तर जाणून घेऊयात की सगळं तपशील काय आहे.
Income tax job recruitment नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केरळमधील आयकर विभागाने (Income Tax) ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ या पदासाठी भरती जाहीर केली आहे. याभरती अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना 31 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीतून ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अन्य अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीतून 100 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात आली आहे.
वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 56 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- ते 1,12,400/- या वेतनश्रेणीत मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस),
7 वा मजला, आयकर भवन,
जुना रेल्वे स्टेशन रोड,
कोची – 682018
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सूचना
उमेदवारांनी अर्ज पाठवण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच, अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळ किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा. या भरतीअंतर्गत 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया (Application process)
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य चॅनेलद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश असावा:
अर्ज(Application form): अर्जदाराने योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला.
दक्षता मंजुरी प्रमाणपत्र(Vigilance clearance certificate): उमेदवाराविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित नाही किंवा विचार केला जात नाही हे सूचित करते.
सत्यता पडताळणी प्रमाणपत्र(Integrity certificate): उमेदवाराची सत्यता पडताळणी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
ACRs/APARs च्या साक्षांकित प्रती(Attested copies of ACRs/APARs): वार्षिक गोपनीय अहवाल/वार्षिक कार्यप्रदर्शन मूल्यमापन अहवाल गेल्या पाच वर्षांसाठी, अवर सचिव दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याने रीतसर प्रमाणित केलेले आहे. ..
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की आयकर विभागांमध्ये
भरती निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा