WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home loan process 2025 पत्नीच्या नावे होम लोन घेतल्यास लाखो रुपयांचा फायदा होईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home loan process 2025 आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आपण आपल्या पत्नीच्या किंवा महिलांच्या बहिणीच्या नावावर जर होम लोन घेतले तर आपल्याला कशाप्रकारे फायदा होईल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत पत्नीच्या नावे आपण कशा प्रकारची प्रॉपर्टी घेण्यासाठी होम लोनचा वापर करून घेतो त्यावर त्यांचा काय बेनिफिट होणार आहे

Home loan process 2025 पूर्ण माहिती

Home loan process 2025 प्रत्येकाचे घराचे एक स्वप्न असते कारण घर असेल तर परिवारासतो आणि त्या परिवारात घरातील सदस्य हे आनंदाने राहत असतात परंतु घर घेण्यासाठी आर्थिक अडचण असते आणि ही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आपण होम लोन घेत असतो होम लोन घेत असताना काही बेसिक गोष्टी असतात त्याचा आपल्याला आज बघायचे आहेत आपण होम लोन घेताना किती टक्के व्याजदर असतो त्याचप्रमाणे महिलांनी जर होमलोन त्यांच्या नाव घेतले तर काय फायदा होतो हेच आपल्याला या लेखनात बघायचे आहे

आपल्या घरातील स्त्री असेल पत्नी असेल बहीण असेल आई असेल तर आपल्या घरातील लक्ष्मी असतात आणि याच लक्ष्मी घरासाठी देखील फायदेशीर असतात कारण त्यांच्या नावावर जर आपण होम लोन घेतलं तर आपल्याला लाखो रुपयांचा फायदा होतो आणि हा फायदा आपल्याला कसा करून घ्यायचा आहे हे आपण पूर्ण पाहूयात

आपले स्वतःचे घर असणे ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी लोक आयुष्यभराची बचत खर्च करतात. कधी कधी स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी लोकांना होम लोन घेण्याची गरजही भासते. जर तुम्हीही तुमचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी होम लोन घ्यायचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुमची पत्नी तुमचा होम लोन अधिक फायदेशीर बनवू शकते?

गेल्या काही वर्षांत देशाच्या आर्थिक वातावरणात अनेक बदल झाले आहेत. यामध्ये महिलांचे वर्कफोर्समधील योगदान वाढले आहे आणि परिणामी त्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली आहे. त्यामुळे महिला प्रॉपर्टी मालकांची संख्या देखील वाढली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या सर्व्हेप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे अधिक घर आहेत. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत की पत्नीच्या नावावर होम लोन घेतल्याने काय फायदे होऊ शकतात आणि कसे लाखो रुपये वाचवता येऊ शकतात.

महिलांच्या नावे घर घेतल्यास हा फायदा होणार Home loan process 2025

महिला घरमालक बनाव्यात यासाठी अनेक बँका आणि NBFC (Non-Banking Financial Companies) महिलांना स्वस्त व्याजदरावर लोन ऑफर करतात. या ऑफरमध्ये महिला को-अप्लिकंट असतील आणि त्या प्रॉपर्टीच्या को-ऑनरही असतील, तर त्यांना कमी व्याजदरावर लोन मिळते. साधारणतः महिलांना 0.05% ते 0.1% पर्यंत कमी व्याजदरावर लोन दिले जाते. मात्र, ही सवलत वेगवेगळ्या कर्जदात्यांनुसार बदलू शकते आणि ती मुख्यतः अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. कमी व्याजदरामुळे EMI कमी होतो आणि त्यामुळे व्याजाचा खर्चही कमी होतो. यामुळे बचत वाढवण्यात मदत होते.

भारतात प्रॉपर्टीच्या खरेदी किंवा विक्रीवर स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. ही सामान्यतः प्रॉपर्टीच्या किंमतीच्या 3% ते 9% किंवा त्याहून अधिक रेंजमध्ये असते. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये महिलांना स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली जाते.

महिलांनी प्रायमरी किंवा को-अप्लिकंट म्हणून होम लोनसाठी अर्ज केल्यास, त्या आयकर अधिनियमाच्या विविध कलमांखाली कर लाभ घेऊ शकतात. 80C अंतर्गत, उधारकर्ता आपल्या होम लोनच्या प्रिन्सिपल रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळवू शकतो. 24B अंतर्गत, पूर्णतः बांधकाम पूर्ण झालेल्या घरासाठी घेतलेल्या होम लोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत कर सवलत दिली जाते.

महिला घरमालकांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये व्याज दर सबसिडीचाही समावेश आहे. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेत महिलांना घरमालक किंवा को-ऑनर असणे आवश्यक आहे. या योजनेत महिलांना 2.67 लाख रुपयांपर्यंत व्याज सबसिडी मिळते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (EWS) किंवा निम्न उत्पन्न गटातील (LIG) एकल किंवा विधवा महिला 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 6.5% सबसिडीसाठी पात्र ठरतात.

तर अशाप्रकारे आपण महिलांच्या नावावर जर आपण लोन घेतलं तर काय फायदा होतो हे बघितलं आहे त्याचप्रमाणे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी-बारावी बोर्डाच्या नोट साठी9322515123 या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment