Goverment new scheme आज आपण पाहणार आहोत की कोणत्या योजनेतून नागरिकांना 80हजार मिळणार यासाठी त्यांना काय करावे लागेल अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा कागदपत्र काय लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे हे पैसे आपल्याला कसे मिळतील आपल्या खात्यात कशा जमा होतील बघूयात संपूर्ण माहिती.
Goverment new scheme संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी महिलांसाठी सरकार केंद्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते यामध्ये काही योजनांनी सरकार व्यवसाय करण्यासाठी आर्थिक अनुदान देतात काही महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवले जातात लखपती योजना असेल त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मातृत्व योजना महाराष्ट्रात बघायचं झाले तर माझी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना आणि सर्वात लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना याअंतर्गत राज्यातील महिलांना असतील पुरुषांना असेल सक्षम करण्यासाठी त्यांना आर्थिक रित्या मजबूत करण्यासाठी त्यांना नेहमीच मदत करत असतं केंद्र सरकारचे योजना विश्वकर्मा योजना या अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी पैसे देखील दिले जातात आता आणखीन एक योजना हे ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 80 हजार रुपये पर्यंत पैसे मिळू शकतात हे पैशाचा उपयोग करून तुम्ही स्वतःचा छोटा व्यवसाय देखील सुरू करू शकता आता हे पैसे आपल्याला कसे मिळतील याविषयी आपणास सविस्तर माहिती बघणार आहोत
Goverment new scheme सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि शोषित घटकांना सरकारकडून मदत पुरवली जात आहे.
अलीकडे केंद्रातील सरकारने व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांसाठी देखील काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. केंद्रातील सरकारकडून छोट्या व्यवसायिकांना मदत व्हावी म्हणून पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे.
ही योजना रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी म्हणजेच स्ट्रीट व्हेंडर साठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना 80 हजार रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत आज आपण याच महत्त्वाकांक्षी योजनेच्या संदर्भात डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे योजना ?
पीएमम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थीला 80 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जातात. या योजनेतून दिले जाणारे कर्ज हे तीन टप्प्यात दिले जाते. या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच कारण द्यावे लागत नाही.
काहीही तारण न ठेवता या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळते. या योजनेतून फळ विक्रेते, भाजीविक्रेते तसेच रस्त्यावरील इतर विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जरूपी मदत दिली जाते.
कोणतीही मालमत्ता तारण ठेवता या योजनेतून कर्ज मिळते आणि या योजनेतून पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये दिले जातात. पहिल्या टप्प्यातील कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड केली की दुसऱ्या टप्प्यात 20 हजार रुपयांचे कर्ज मिळते.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड केल्यानंतर मग पन्नास हजार रुपये कर्ज मंजूर केले जाते. अशा तऱ्हेने या योजनेच्या माध्यमातून एकूण तीन टप्प्यात 80 हजार रुपयांची मदत केली जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेत 3 हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाणार आहे.
दरम्यान यातील पहिला हप्ता घेतल्यानंतर तो 1 वर्षाच्या मुदतीत परत करायचा आहे. जर तुम्ही पहिला हप्ता परत दिला तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीने पहिला हप्ता परत केला नाही तर त्याला पुन्हा या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
अर्ज कुठे करायचा
केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी इच्छुक अर्जदार कोणत्याही बँकेत जाऊन अर्ज करू शकतात. ही एक सरकारी योजना असून या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. दरम्यान बँकेत अर्ज सादर केल्यानंतर मग तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत
अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्याला कोणत्या योजनेतून 80 हजार रुपये मिळणारे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा