Gas cylinder Today price आज आपण पाहणार आहोत की गॅस धारकांना मोठा धक्का बसलेला आहे गॅस सिलेंडरच्या किमतीत किती वाढ झालेली आहे यामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे नेमके कोणत्या गॅस सिलेंडर हे महाग झालेले आहेत किती रुपयाने महाग झाले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात
Gas cylinder Today price पूर्ण माहिती
आज सर्वसामान्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असतो या गॅस सिलेंडरचा भाव हा प्रत्येक महिन्याच्या तारखेला बदलत असतो आज पहिली तारीख आहे यामध्ये गॅस सिलेंडरच्या भावात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ धक्का बसलेला आहे गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या घरात असतो आपल्या स्वयंपाक घरात आपल्या उपजीविकासाठी इंधन म्हणून त्याचा वापर सर्व सामान्य घरात केला जातो परंतु याचेच काही दर वाढले तर नक्कीच त्यांना आर्थिक फटका बसलेला असतो तर आज आपण पाहणार आहोत या गॅस सिलेंडरचे भाव नेमके किती रुपयांनी वाढलेले आहेत
Gas cylinder Today price होळी आणि ईदपूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १ मार्च २०२५ पासून म्हणजेच आजपासून वाढवण्यात आली आहे. इंडियन ऑइलने १ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे दिल्लीत या सिलिंडरची किंमत १७९७ रुपयांवरून १८०३ रुपयावर पोहोचली आहे.
सरकारी कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार आजपासून नवीन महिना सुरू होतो आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आजपासून नव्या किंमती लागू केल्या आहेत. मात्र, हा सणासुदीचा महिना आहे. याच महिन्यात होळी आणि ईद हे सण आहेत. उद्यापासून रमजानचा महिना सुरु होतो आहे. याशिवाय अनेक लग्नकार्यही या महिन्यात पार पाडणार आहेत.
पण सणासुदीच्या काळातच कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत सहा रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर रेस्टॉरंटमध्ये उ किंवा इतर पदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.
नव्या दरानुसार दिल्लीत दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १७९७ रुपयांवरून १८०३ रुपये करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये या सिलिंडरची १९०७ रुपयांवरून १९१३ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर १७४९.५० रुपयांवरून १७५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये, व्यावसायिक सिलिंडरचे दर १९५९ रुपयांवरून १९६५ रुपयांवर पोहोचले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ही दरवाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही वाढ करण्यात येत नसल्याचं कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की गॅस सिलेंडरच्या किमतीत किती वाढ झालेली आहे कशामुळे झालेले आहेत याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा