Driving licence apply आज आपण पाहणार आहोत की घरबसल्या आपल्याला ड्रायव्हिंग लायसन कसे काढता येईल यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे मात्र काय असेल कागदपत्र कोणते लागतील आणि अर्ज कोठे करायचा ज्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंग करता येईल याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.
Driving licence apply संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला प्रत्येकाला वाहन असताना वाहन चालवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन लावत असेल ड्रायव्हिंग लायसन काढताना भरपूर काही अडचण येतात भरपूर लोकांना माहितीच नसतं की ड्रायव्हिंग लायसन आपण कुठे काढायचे असते तर तुम्हाला आता माहिती आहे का ड्रायव्हिंग लायसन काढणं खूपच सोपं झालेलं आहे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन काढू शकता याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप ड्रायव्हिंग लायसन कसे काढायचे बघूया संपूर्ण माहिती
Driving licence apply यव्हिंग लायसन्स हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. परंतु RTO कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे अनेकांना किचकट वाटते. परंतु आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टेलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरून तुम्ही लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
ऑनलाईन काय करता येते?
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येत नाही तर त्यासंबंधी इतर अनेक कामेही करता येतात. लायसन्ससह तुम्ही पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील ऑनलाइन अर्ज करू शकता. फॉर्म सोप्या पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही Aadhaar eKYC चा वापर करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता, याची पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
काय करावे लागते?
त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan# या साइटवर जा. येथे तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसेजमध्ये Driving License Related Services पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये Apply For Learner License वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही eKYC आधारचा वापर केल्यास टेस्टसाठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या लर्नर लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही येथे non-Aadhaar eKYC पर्याय निवडल्यास आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. येथे तुम्हाला Aadhaar Authentication पर्याय निवडून आधार नंबर द्यावा लगेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. हा नंबर व्हेरिफाय करा. आता Aadhar eKYC द्वारे तुमची माहिती आपोआप भरली जाईल.
जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
तुम्ही non-Aadhaar eKYC पर्याय निवडला असल्यास फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉग इन करावे लागेल. येथे तुम्हाला Applicant does not hold Driving/ Learner Licence पर्याय निवडून तुमच्या जवळील आरटीओची निवड करावी लागेल. यानंतर इतर माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा. आता स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्टसाठी स्लॉट बुक करा. ऑनलाइन टेस्टसाठी लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळतील. ऑफलाइन टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला Print Learner License पर्यायावर जाऊन डाउनलोड करू शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की घरबसल्या आपल्याला ड्रायव्हिंग लायसन कसं करता येईल याची माहिती आपण बघितले आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp telegram ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा