WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM new rules  ATM मधून पैसे काढण्यासाठी नियम बदलले ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM new rules आज आपण पाहणार राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एटीएम मधून पैसे काढण्यासंदर्भात आता बँकेने नियम बदलले आहेत नेमके कोणत्या बँकेने हे नियम बदलले आणि याचा काय फटका बसणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

ATM new rules संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर आहे एटीएम वापरण्यासंदर्भात आता नवीन नियम जारी केलेले आहेत एटीएम प्रत्येक वेळी असते ज्याच्याकडे सेविंग खात आहेत त्यांच्याकडे एटीएम असताना एटीएम चा उपयोग करून व्यक्ती कुठेही आपले पैसे काढू शकतो एटीएम कार्डचा उपयोग बहुतेक लोक करत असतात आता या एटीएम मध्ये पैसे काढण्यासंदर्भात काही बँकेने नियम बदलले आहेत या नियमांची माहिती ग्राहकांना असणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

ATM new rules सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढण्याचे आणि शिल्लक तपासण्याच्या नियमात बदल केला आहे. डिजिटल बँकिंग व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या नियमांनुसार ग्राहकांना एटीएममधून दरमहिन्याला कोणत्याही शुल्काशिवाय १५ मोफत व्यवहार करता येणार आहेत.

काय आहे नवीन नियम

नव्या नियमांनुसार ग्राहकांना आता एसबीआयच्या एटीएममधून दरमहा ५ वेळा आणि इतर बँकांच्या एटीएममधून दरमहा १० वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत. याचाच अर्थ तुम्ही दरमहिन्याला कोणत्याही शुल्काशिवाय १५ व्यवहार करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या खात्यात सरासरी १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम शिल्लक असेल तर तुम्हाला अमर्यादित मोफत व्यवहारांची सुविधा मिळणार आहे.

 आता तुम्ही जर एसबीआयच्या एटीएममधून मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा म्हणजेच ५ पेक्षा जास्तवेळा एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी १५ रुपये + जीएसटी आणि अन्य बँकांच्या एटीएममधून १० पेक्षा जास्तवेळा पैसे काढले तर प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये+ जीएसटी मोजावे लागतील.

 तुम्ही एसबीआयच्या एटीएमवर खात्यातील शिल्लक रक्कम तपासली किंवा मिनी स्टेटमेंट काढले तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र अन्य बँकांच्या एटीएमवर खात्यातील शिल्लक रक्कम तपासली किंवा मिनी स्टेटमेंट काढले तर त्यासाठी १० रुपये+ जीएसटी मोजावे लागतील.

तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील आणि एटीएमवर तुमचा व्यवहार अयशस्वी झाला तर एसबीआय २० रुपये+ जीएसटी असा दंड आकारते. हा नियम आधीपासूनच लागू करण्यात आलेला असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एटीएम व्यवहाराबाबत रिझर्व्ह बँकेनेही नवे नियम आणले असून ते १ मेपासून लागू होतील. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुम्ही कोणत्याही बँकेचे ग्राहक असला तरी तुम्हाला मोफत व्यवहार मर्यादेनंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये+जीएसटी एवढे शुल्क आकारले जाईल.

डिजिटल बँकिंग व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी यूपीआय, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल ऍपद्वारे व्यवहार केले तर त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. डिजिटल बँकिंग व्यवहारामुळे वेळेबरोबरच पैश्याचीही बचत होईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एटीएम संदर्भात बँक केने कोणते नियम केलेले आहेत याबद्दल आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment