New rules 2025
आज आपण पाहणार आहोत की आजपासून इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत आहे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काय ना काही बदल होत असतात याचा सर्व सामान्य च्या आयुष्यात कसा परिणाम होतो आणि कुठले बदल यावर्षी होणार आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत
New Rules 2025
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2025 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नवीन वर्षाला सुरूवात होणार असून नव्या वर्षाच्या सुरूवातीला काही महत्वाचे बदल होणार आहेत
नवीन वर्षाच्या सुरवातीला असे अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट तुमच्याशी संबंध आहे. थेट तुमच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. जाणून घ्या नेमके काय बदल होणार आहे
New Rules 2025
1) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल पाहायला मिळतील. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे त्याच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हे बदल करत असतात.
2) 1 जानेवारी 2025 रोजी EPFO कडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. EPFO आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे..
3) कारच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे. कार खरेदी करणे महाग होणार असून.
New Rules January 2025
4) सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सवरून मासिक एक्स्पायरीपर्यंत बदलण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे.
5) वर्षाच्या पहिल्या दिवसापासून RBI शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देईल. यामुळे आता त्यांना 1.6 लाख नाही तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहेत
New Rules 2025 January
6) UPI 123Pay चे नियम बदलणार आहेत. 1 जानेवारीपासून हा बदल लागू होणार आहे. आता फोनद्वारे 10,000 रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये इतकी होती आहे
New Rules 2025
7) ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एका अकाऊंटवरून फक्त दोन टीव्हीवर प्राइम व्हिडिओ स्ट्रीम होऊ शकतील. प्राइम व्हिडिओ दोन पेक्षा अधिक टीव्हीवर पाहायचा असेल तर त्याला नवे सबस्क्रिप्शन घ्यावे लागले आहेत
new rules january 2025
शेतकऱ्यांना हमी शिवाय मिळेल इतके कर्ज- कर्जाशी संबंधित काही नवीन नियम जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे व विशेषतः शेतकऱ्यांना आता कुठल्याही तारणाशिवाय कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही हमी शिवाय मिळते.परंतु आता दोन लाख रुपयापर्यंत लिमिट वाढण्याची शक्यता असून दोन लाख रुपयापर्यंत कर्ज आता शेतकऱ्यांना कुठल्याही हमीशिवाय मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जाच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळू शकते व ती त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
new rules january 2025
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता- जानेवारी 2025 पासून कर दरांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात व त्यामुळे ग्राहकपयोगी वस्तूंच्या किमती वाढू शकतात.त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. वस्तूच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता असून या बदलामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये नव्याने नियोजन करावे लागू शकते.
New Rules 2025 January
4 कोटी फीचर वापरकर्ते
UPI 123pay मध्ये, प्रत्येक वापरकर्त्याला पेमेंट पर्याय म्हणून 4 पर्याय दिले जातात. यामध्ये IVR नंबर, मिस्ड कॉल्स, OEM-एम्बेडेड ॲप्स आणि ध्वनी आधारित तंत्रज्ञानाचा समावेश आहे. फीचर फोन वापरकर्ते IVR नंबरद्वारे UPI व्यवहार करू शकतात. वापरकर्त्यांना IVR क्रमांक- 080-45163666, 08045163581 आणि 6366200200 वर कॉल करावा लागेल. त्यानंतर UPI ची पडताळणी करावी लागेल. यानंतर, कॉलवर दिलेल्या सूचना पूर्ण केल्यानंतर पेमेंट पूर्ण केले जाईल. सध्या भारतात 4 कोटी फीचर फोन वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत या वापरकर्त्यांना मोठी सुविधा मिळणार आहेत
2025 january new rules
UPI ची ही सेवा कधी सुरू झाली?
UPI वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना डिजिटल व्यवहारांशी जोडण्यासाठी, UPI 123 Pay वैशिष्ट्य मार्च 2022 मध्ये लाँच करण्यात आले. असे मानले जाते की UPI पेमेंट भारतातील लहान शहरे आणि गावांमध्ये वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत RBI ने UPI पेमेंटची मर्यादा दुप्पट केली आहे. त्याचबरोबर श्रीलंकेसह इतर अनेक देशांमध्ये UPI सुरू करण्यात आले आहेत
New rules 2025
मुदत ठेव योजनांच्या नियमांमध्ये होईल बदल- तुम्ही मुदत ठेव मध्ये गुंतवणूक केल्यास जानेवारीपासून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवीन नियम याकरिता लागू होऊ शकतात. जर हे नियम लागू झाले तर त्यानुसार एफडीच्या प्रक्रियेत आणि अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे व हे बदल तुमच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे असू शकतात.
जर अशा प्रकारचे बदल झाले तर तुम्ही तुमची गुंतवणूक योजना वेळेत समजून घेऊन आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नवीन नियमांच्या बाबत आधीच माहिती दिली आहे. जेणेकरून गुंतवणूकदार त्यांनी निवडलेल्या योजनेत बदल करू शकतील किंवा योजना निवडताना योग्य प्रकारे निवडू शकतील.
वरील लेखात आपण यावर्षी जानेवारी महिन्यात काय बदल होणार आहेत याची माहिती घेतली आहे.