WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission process दहावी परीक्षेत नापास झाला तरी अकरावीत प्रवेश मिळणार शिक्षण विभागाच्या मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission process आज आपण पाहणार की राज्य मंडळाचा दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे यामध्ये दहावीच्या परीक्षेत काही मुलांना अपयश आलेले आहे तरी काळजी करू नका कारण तुम्हाला पुढील प्रवेश मिळणार आहे याबाबत काही नियम असतात या नियमांची माहिती आपण आज घेणार आहोत आणि पुढचा प्रवेश आपल्याला कसा मिळेल याविषयी माहिती बघूयात

11th addmission process संपूर्ण माहिती


राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल काय झाला यामध्ये भरपूर मुलांना चांगले यश मिळालेले आहे तर काही मुलांना अपयश झाले आहेत त्यामुळे आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या मुलांना परीक्षेत अपयश मिळालेले आहे जे मुला परीक्षेत नापास झालेले आहेत अशा मुलांना देखील आता अकरावीत प्रवेश मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मला सांगतात आणि कोणत्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळवता येईल आणि त्यानंतर त्यांना काय करावं लागतं प्रोसेस याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कारण दहावीच्या परीक्षेचा तुम्ही नापास झाला असता तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आता पुढील प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत होईल आणि तुमचं शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही याविषयी आपण माहिती बघूया

11th addmission process महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.१४ टक्के इतका लागला आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ टक्के इतकी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणकोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबद्दलची माहिती दिली आहे.

दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेनुसार अकरावीत प्रवेश करता येणार आहे. बोर्डाने याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरु केली आहे. या परीक्षेत सर्व विषयात पास झालेला विद्यार्थी यानंतरच्या तीन परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पास झालेला विद्यार्थी हा जून जुलै २०२५ परीक्षा, फेब्रुवारी मार्च २०२६ आणि जून जुलै २०२६ च्या परीक्षेला श्रेणी सुधारतंर्गत या तिन्ही परीक्षेसाठी किंवा तिन्हीपैकी एका परीक्षेसाठी तो पुन्हा प्रविष्ठ होऊ शकतो, असे शरद गोसावी यांनी म्हटले.

दहावी नापास झालेला विद्यार्थी अकरावीला कसा घेईल प्रवेश?
तसेच दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी त्याला 11 वीमध्ये प्रवेश दिला जातो. याला allowed to keep terms म्हणजेच ATKT दिली जाते. यानुसार तो विद्यार्थी अकरावीत अॅडमिशन घेऊ शकतो. मात्र बारावीत प्रवेश घेण्यापूर्वी त्याला दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल. हा विद्यार्थी जून-जुलैची २०२५ किंवा फेब्रुवारी मार्च २०२६ ची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला आणि अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तो बारावी परीक्षेला प्रवेश घेण्यास पात्र ठरु शकतो, असेही शरद गोसावींनी म्हटले.

दहावीच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी: १५ लाख ४६ हजार ५७९
उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी: १४ लाख ५५ हजार ४७७
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल: ९४.१०%
दिव्यांग विद्यार्थी नोंदणी: ९ हजार ६७३
परीक्षेला बसलेले दिव्यांग विद्यार्थी: ९ हजार ५८५
उत्तीर्ण झालेले दिव्यांग विद्यार्थी: ८ हजार ८४८
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल: ९२.२७%
एकूण नोंदणी (सर्व विभाग): १६ लाख १० हजार ९०८
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी (सर्व विभाग): १५ लाख ९८ हजार ५५३
उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी (सर्व विभाग): १४ लाख ८७ हजार ३९९
सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल: ९३.०४%

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाच्या परीक्षेत जरी तुम्ही नापास झाला असता तर तुम्हाला पुढील अकरावी प्रवेश कसा मिळणार याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment