Whats app new update आज आपण पाहणार आहोत की व्हाट्सअप धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे व्हाट्सअप मध्ये काय बदल झालेला आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत या बदलामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे आणि त्याला काय आवश्यक आहे बघूया संपूर्ण माहिती.
Whats app new update संपूर्ण माहिती
आजच्या या डिजिटल युगामध्ये सर्वत्र ऑनलाइन व्यवहार चालतात सर्व गोष्टी ऑनलाईन होतात सर्वत्र मोबाईल वापरले जातात आणि मोबाईल मध्ये व्हाट्सअप असताना व्हाट्सअप मध्ये प्रत्येक जण काही ना काही शेअरिंग करत असतो फोटो असेल बातम्या असेल टेक्स्ट असतील काय मेसेज असेल तर सर्व गोष्टी व्हाट्सअप द्वारे आपण सेकंदात पाठवू शकतो सर्वात मोठा फायदा आहे याच गोष्टीमुळे व्हाट्सअप युजर ची संख्या जास्त आहे आणि युजरची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना नेहमी काय ना काही चांगल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्या लागतात
Whats app new update व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी आणखी एक उपयुक्त आणि बहुभाषिक सुविधा घेऊन आलं आहे. अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी चॅटमधील मेसेज थेट अॅपमध्येच भाषांतर करता येईल, असा नवा फिचर व्हॉट्सअॅपने बीटा अपडेटद्वारे सुरु केला आहे. व्हर्जन 2.25.12.25 मध्ये ही सुविधा उपलब्ध झाली असून सध्या काही निवडक युजर्सना ती वापरता येत आहे.
काय आहे या नव्या फिचरचं वैशिष्ट्य?
या फिचरमुळे वापरकर्ते आपल्या चॅटमध्ये येणाऱ्या मेसेजचं भाषांतर लगेच करू शकतात. विशेष म्हणजे, या अनुवादासाठी इंटरनेटची गरज लागत नाही कारण संपूर्ण प्रक्रिया फोनमध्येच होते. यामुळे युजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि कोणत्याही बाहेरच्या सर्व्हरवर माहिती पाठवली जात नाही.
कशा प्रकारे वापरता येणार भाषांतर फिचर?
चॅटच्या “Chat Info” स्क्रीनमध्ये जाऊन युजर्सना भाषा पॅक डाउनलोड करता येतो.
एकदा पॅक इन्स्टॉल केल्यावर तुम्ही हिंदी, स्पॅनिश, अरबी, रशियन, ब्राझिलियन पोर्तुगीज यांसारख्या भाषांमध्ये भाषांतर करू शकता.
ग्रुप चॅटमध्ये अनेक भाषा वापरल्या जात असतील, तर व्हॉट्सअॅप ऑटो डिटेक्ट लँग्वेज पॅक देखील उपलब्ध करून देत आहे.
प्रत्येक चॅटसाठी स्वतंत्र अनुवाद सेटिंग्ज करता येतात.
गोपनीयता आणि नियंत्रणावर भर
ट्रान्सलेशन पूर्णतः ऑन-डिव्हाईस होते, त्यामुळे एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शन कायम राहतं.
युजर्सना स्वतःहून एखादा मेसेज निवडून ‘Translate’ पर्याय वापरता येतो किंवा संपूर्ण चॅटसाठी ऑटो ट्रान्सलेशन चालू करता येतं.
फीडबॅक देणं पर्यायी आहे आणि त्यादरम्यानही कुठलाही मेसेज Meta कडे जात नाही.
जर तुम्ही काही भाषा वापरणं बंद केलं असेल तर व्हॉट्सअॅपच्या Storage Settings मधून लॅंगवेज पॅक डिलीटही करता येतात. यामुळे फोनमधील जागा मोकळी ठेवणंही शक्य होतं.
ही सुविधा सध्या फक्त Google Play Store वरून बीटा अपडेट करणाऱ्या निवडक युजर्सना मिळाली आहे. मात्र पुढील काही आठवड्यांत हे फिचर सर्व अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल, असं व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे. भविष्यात आणखी भाषा जोडण्याचंही नियोजन आहे.
तर बहुभाषिक संवाद आता आणखी सहज होईल! व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधणं आता खूपच सोपं आणि सुरक्षित होणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की whatsapp धारकांसाठी काय आनंदाची बातमी याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Ha upakram khup changla aahe . Jya vodyarthyanchi paristithi wite aahe asha vidyarthyan sathi ha upakram khup upayogi aahe.