WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tax Saving Tips 2025 टॅक्‍स वाचवण्यासाठी हे बेस्‍ट उपाय टॅक्स भरावाच लागणार नाही उलट रिटर्न मिळेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tax Saving Tips 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला आर्थिक वर्षांमध्ये इन्कम टॅक्स वाचता येईल कशाप्रकारे कुठल्या उपाययोजना असतील आणि आपल्याला चांगला रिटर्न कसा मिळेल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.

सरकारी योजना असतील किंवा तुमचा काही बिझनेस असेल तुमचं उत्पन्न हे जास्त असेल तुम्हाला नोकरी असेल तर या ठिकाणी सरकारचा टॅक्स भरावा लागतो परंतु भरपूर लोकांना हा टॅक्स हा विषय गुंतागुंतीचा वाटतो त्यामुळे त्यांचा ऐकताना व्यवस्थित करता येत नाही तर तो व्यवस्थित रित्या कसा भरता येईल काही बेस्ट टिप्स आपल्याला या लेखनात बघायचे आहे

Tax Saving Tips 2025 आर्थिक वर्ष 2024-25 पूर्ण होण्यास जास्त कालावधी राहिला नाही. अनेक जण अर्थतज्ज्ञांचा सल्ला न ऐकता शेवटी शेवटी कर वाचण्यासाठी धावपळ करत असतात. आयकर वाचवण्याचे पर्याय शोधत असतात. गुंतवणुकीचे हे पर्याय फक्त आयकर वाचवण्यासाठी नाही तर चांगले रिटर्न मिळवून देणार आहेत.

ईएलएसएस, पीपीएफ, टॅक्‍स सेवर एफडी आणि सीनियर सिटीजन सेविंग स्‍कीम या गुंतवणुकीच्या योजना आपल्या गरजेनुसार वापरता येतात. यामधून चांगली योजना निवडून आपले गुंतणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करता येते.

Tax Saving Tips 2025 बेस्ट उपाय

इक्विटी-लिंक्ड सेविंग्स स्कीम म्हणजे ELSS फंड्समध्ये पैसे लावून आयकर अधिनियमच्या कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखपर्यंत सूट मिळू शकते. तीन वर्षांच्या लॉक-इन अवधीसोबत यामध्ये चांगला परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही अधिकतम सीमा नाहीं

मुलींसाठी सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी आणखी एक चांगली योजना आहे. यामध्ये कलम 80C नुसार ₹1.5 लाखपर्यंत सुट मिळते. तसेच मिळणारे रिटर्न पूर्णपणे करमुक्त असतात. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी ही योजना घेता येते.

NPS मध्ये देखील फायदा होईल Tax Saving Tips 2025

नॅशनल पेंशन सिस्टम (NPS) कर बचतीसाठी चांगला उपाय आहे. यामधून केवळ रिटर्न मिळत नाही तर पेन्शनची सुविधा होते. वयाच्या 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यावर त्यातील एक भाग काढता येतो. उर्वरित रक्कमेवर पेन्शन मिळते. सेक्शन 80सीसीडी (1बी) अंतर्गत एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यावर वर्षाला 50,000 रुपयापर्यंत कर बचत होते. ही रक्कम 80सी मधील 1,50,000 लाख रुपयांपेक्षा वेगळी आहे.

टर्म लाइफ इंश्योरेंस म्हणजे टर्म प्लॅनचा प्रीमियमवर आयकर अधिनियम कलम 80C अंतर्गत सुट मिळते. तसेच दरवर्षी रिन्यूअल प्रीमियमवरसुद्धा आयकर सुटचा लाभ घेऊ शकता. पीपीएफमधील गुंतवणूक फायदेशीर आहे. यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. तसेच 80C अंतर्गत सुट मिळते.

सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) वरिष्‍ठ नागरिकांसाठी चांगली योजना आहे. यामुळे 8.2% व्याज मिळते. कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीचा लाभ मिळतो. यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

यूनिट लिंक्ड इंश्योरेंस प्लॅन (ULIP) मधून जीवन बीमा, टॅक्स बचत आणि चांगला परतावा मिळू शकतो. त्याचा लॉक-इन पीरियड 5 वर्षांचा आहे. यामधील गुंतवणूक, रिटर्न, मुदतीनंतर मिळणार रक्कम सर्व करमुक्त आहे. तुम्ही पाच वर्षांसाठी ही योजना घेतल्यास 80C नुसार 1.5 लाख रुपयांपर्यंत सुट मिळते.

FD धारकांसाठी Tax Saving Tips 2025

एफडी गुंतवणूक आणि कर बचतीसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये आयकर अधिनियमनुसार 80C नुसार 1.5 लाखपर्यंत सुट मिळते. पाच वर्षांच्या लॉक इन कालावधीत पैसे काढता येत नाही.

वरील लेखनात आपण टॅक्स वाचवण्यासाठी कुठल्या बेस्ट उपाय आहेत याची माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप अथवा टेलेग्राम ग्रूप जॉईन करा

Leave a Comment