Ladaki bahin yoajana january installment आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता कधी मिळणार त्याचप्रमाणे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी किती निधी मंजूर केला आहे याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
राज्यातील लाडक्या बहिणींना जवळपास सहा ते मिळालेले आहेत आता सातवा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा राज्यातील लाडक्या बहिणी करत आहेत या संदर्भातच एक महिला बालविकास मंत्री आदीती तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत दिलेली आहे
Ladaki bahin yoajana january installment पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत दिल्या. या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी ३,६९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली. तसेच योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे
राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर ५३६ सेवा उपलब्ध असून संबंधित विभागाच्या संकेतस्थळांवर ९० सेवा आहेत. मात्र ३४३ सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जातात. या सर्व सेवा ‘आपले सरकार ’ संकेतस्थळावर उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. हे काम १०० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले जाणार आहे
Ladaki bahin yoajana january installment
हप्ता कधी जमा होणार
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान वितरीत केला होता. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येईल.
या संदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास २६ जानेवारीच्या आधी सुरुवात होईल. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत या योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील”, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे
उद्योग सुलभतेला प्राधान्य
राज्यात ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संकल्पनेवर काम करण्यास भर देण्यात येत असून त्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत
2100रुपये कधी मिळणार Ladaki bahin yoajana january installment
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की १५०० रुपये मिळणार? असा प्रश्न मंत्री आदिती तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता आदिती तटकरे यांनी सांगितलं की, “याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे.
नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, सध्या तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे
वरील लेखनात आपण लाडक्या बहिणी विषयी पूर्ण माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा