WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tactor anudan yojana ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकारकडून 3लाख मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tactor anudan yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकारकडून आपल्याला तीन लाख अनुदान देणार आहे यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागतील अर्ज कुठे करायचा आहे पात्रता काय असणार आहे या विषयाचे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Tactor anudan yojana संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला सरकार खटल्याने कुठल्या योजनेसाठी काही ना काही आर्थिक अनुदान देत असतात त्याच्यामध्ये भरपूर काही योजना आहे जसं सोलर पंप असेल त्यानंतर तुम्हाला माहीत असेल पीएम सुर्या घरी योजना प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये आपले सरकार सबसिडी घेत असताना तुम्हाला माहिती आहे का ट्रॅक्टर घेण्यासाठी देखील आता तुम्हाला सरकार अनुदान देणार आहे ट्रॅक्टर किती महत्त्वाचं संसाधन आहे शेतकऱ्यांसाठी आपल्याला माहिती आहे त्याच्यावर तो स्वतःचे काम देखील करू शकतो आणि त्याच्यावर काम करून तो पैसे देखील स्वतःचे कमवू शकतो पण ट्रॅक्टर एकदम तुम्हाला घ्यायचं असेल तर सरकर करून जवळपास तुम्हाला पैसे मिळणार आहेत याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

Tactor anudan yojana अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कृषी क्षेत्रात मोठी मदत ठरू शकणारी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्यासोबत लागणाऱ्या उपसाधनांच्या खरेदीसाठी गटांना भरघोस अनुदान देण्यात येणार आहे.

ही योजना खास करून शेतीशी निगडित आणि ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. शेतजमिनीच्या मशागतीसाठी आवश्यक असलेले मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलरसारखी साधने खरेदी करण्यासाठी सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

योजनेअंतर्गत लाभार्थी गटांना 9 ते 18 एचपी क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व त्यासोबतचे साधन खरेदी करता येणार आहे. एकूण खरेदी खर्चाची मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आली असून, त्यावर 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत शासकीय अनुदान मंजूर केले जाईल. उर्वरित 35 हजारांचा खर्च संबंधित गटाने करावा लागेल

अर्ज करण्याच्या अटी नियम काय आहेत?
अर्जदार स्वयंसहाय्यता बचत गट महाराष्ट्रातील नोंदणीकृत गट असणे आवश्यक आहे. गटातील अध्यक्ष, सचिव आणि किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना गटाची नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, प्रत्येक सदस्याचे जातीचे दाखले, बँक खात्याचे तपशील, तसेच खरेदी करावयाच्या साधनांचा अंदाजित खर्च यांची माहिती देणे आवश्यक आहे. अर्जदार गटाने शेतीशी संबंधित कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असावा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक बचत गटांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने केले आहे.

दरम्यान, योजनेविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत अधिकृत माहिती मिळू शकते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकारकडून किती पैसे मिळणारे त्याचे माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

Leave a Comment