WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Summer vacation schools शाळा कॉलेज शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या या तारखेपासून मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Summer vacation schools आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शाळा कॉलेज शिक्षकांना उन्हाळ्यात सुट्ट्या कोणत्या तारखेपासून मिळणार आहेत याबाबत आज माहिती आपण घेणार आहोत शिक्षक आणि विद्यार्थी या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची प्रतीक्षा करणार आहेत आणि या सुट्ट्या कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे नवीन शैक्षणिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होईल बघूयात संपूर्ण माहिती.

Summer vacation schools संपूर्ण माहिती


राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाची बातमी येते त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी देखील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तुमचे गावाला जायचं प्लॅन असेल तर तुम्हाला देखील माहिती पडणं असं गरजेचं आहे की शाळा कधीपासून सुट्ट्या लागणार आहे किती तारखेपर्यंत असणार आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत कारण या सुट्ट्यांचे नियोजनच करून तुम्हाला पुढचा नियोजन करायचे असते त्यामुळे शिक्षकांच्या आणि शाळा कॉलेज संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे बघूया संपूर्ण माहिती

Summer vacation schools शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा उद्या (शुक्रवारी) संपणार आहेत. त्यानंतर २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. पण, शिक्षकांना ५ मेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. रमझान ईद आणि वेळ आमवस्येची सुटी कामाच्या दिवशी घेतल्याने शिक्षकांची उन्हाळा सुटी दोन दिवस लांबणार आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्षातील २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान ८०० तास तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालू राहिली.

शुक्रवारी (ता. २५) २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस असणार आहे. २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्या लागतील. १ मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल (प्रगतीपत्रक) जाहीर होईल. त्यानंतर देखील शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे. दरम्यान, पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

दरवर्षी शिक्षकांना १२८ दिवस सुट्या
दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना १२८ दिवस सुट्या असतात. ७६ सार्वजनिक सुट्या असतात आणि त्यात उन्हाळा, दिवाळी सुट्या असतात. याशिवाय वर्षात ५२ रविवार देखील येतात. वर्षातील ३६५ दिवसांतून २३७ दिवस उरतात, पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असा नियम आहे.

१५ जूनपासून शाळा सुरू होतील
विद्यार्थ्यांना २६ एप्रिलपासून तर शिक्षकांना ६ मेपासून उन्हाळा सुट्या असतील. पुढे १५ जूनला शाळा सुरू होतील. दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येत किमान १० टक्के वाढ होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेज सुटतात किती तारखेपासून आहेत आणि कधी सुरू होणार आहेत याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment