SSC MATHS IMP 2024 आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाच्या गणिताच्या पेपराधी बोर्डाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थी पालकांचे चिंता वाढलेले आहेत नेमकं हा निर्णय कोणता आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SSC MATHS IMP 2024 पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळपास बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत दहावी बोर्डाचा मराठी हिंदी इंग्रजी पेपर झालेले आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा पेपर गणिताचा होणार आहे गणिताच्या पेपराआधी आता कोठेही काही गैरप्रकार होऊ नये यासाठी बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचीच माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत विद्यार्थी जीवनामध्ये गणिताचा पेपर हा भरपूर महत्त्वाचा असतो गणिताच्या पेपरात काही गैरप्रकार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे राज्य शिक्षण महामंडळ सतर्क झालेले आहे यात त्यांनी बैठे पथक भरारी पथक ड्रोन कॅमेरे त्याचप्रमाणे परिसरात काही कलम लागू केलेले आहेत यामुळे आता गणिताचा पेपर हवा तसा कुठल्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही याची तर पूर्णतः दक्षता बोर्डाने घेतली आहे.
कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार
कॉपीमुक्त अभियान राबवत परीक्षेसाठी आवश्यक नियमावली विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. परीक्षेत कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शांतपणे आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असेही गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा दरम्यान आता कॅमेऱ्याची नजर असणार
दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष पावले उचलली आहेत. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्याद्वारे हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाला सोपवण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्राबाहेर घडणाऱ्या हालचालींनेही व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. या उपाययोजनांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हॉल तिकीट विसरल्यास घाबरायचे कारण नाही
परीक्षेसाठी विद्यार्थी हॉल तिकीट विसरल्यास घाबरण्याचे कारण नाही असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. हॉर तिकीट नसल्यानाही विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. पुढील दिवशी मात्र हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षेसाठी वेशभूषेवर कोणतेही बंधन नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मंत्री नितेश राणे यांनी बुरखा घालण्यास बंदीची मागणी केली होती मात्र परीक्षा मंडळाने कोणत्याही वेशभूषेत परीक्षा केंद्रावर येण्यास परवानगी दिली आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच प्रवेश दिला जाईल असे मंडळाने सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा ताणतणाव कमी करण्यासाठी समुपदेशकांची मदत उपलब्ध करून देण्यात आली विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची, याबाबत तणाव असल्यास ते समुपदेशकांशी थेट फोनवर संपर्क साधू शकतात असे शरद गोसावी यांनी सांगितले. मात्र परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून परीक्षा पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचा उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांवर लक्ष ठेवण्याची पद्धत स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला. अखेर मंडळाने निर्णय बदलत २०१८ ते २०२४ या काळात ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघड झाले, त्याच केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय घेतला. आता याच सुधारित धोरणानुसार परीक्षेची कार्यवाही करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या गणिताच्या पेपराबाबत बोर्डाने काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा