SSC MATHS BOARD PAPER आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे आणि हा निर्णय विद्यार्थ्यांना का उपयुक्त आहे त्याप्रमाणे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कोणता फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SSC MATHS BOARD PAPER पूर्ण माहिती
राज्यात दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठा फायदा होणार आहे दहावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी पास झाल्यानंतर आणखीन एक मोठा परीक्षा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे की आता प्रवेश प्रक्रिया कशी असेल कुठल्या शाखेत प्रवेश द्यायचा आणि कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आता हाच प्रश्न काही ठिकाणी कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश होतात काही ठिकाणी ऑफलाइन होतात तर आता यावर सगळ्यात तोडगा म्हणजे सरकारने आता सरसकट प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने केलेले आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहूयात.
SSC MATHS BOARD PAPER आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या प्रवेश प्रक्रियेवर शिक्षण आयुक्त नियंत्रण ठेवणार असून, त्याची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात येईल.
काही वर्षांपूर्वी विद्यार्थी आणि पालकांना अकरावी प्रवेशासाठी ( Maharashtra 11th Admission ) प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अर्ज मिळवावा लागत होता. हा अर्ज भरल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयात जाऊन त्यांची ‘कट ऑफ’ यादी पाहून प्रवेश घ्यावा लागत होता. या प्रक्रियेमुळे विद्यार्थी पालक यांचे हाल होत होते. त्यामुळे सर्व प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवावी, असा विचार राज्य सरकारने केला
त्यानुसार, २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे आणि रायगड या मुंबई महानगर प्रदेशातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्रवेशही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. या प्रक्रियेमुळे आलेली सुलभता आणि व्यवहार्यता पाहून अमरावती, नागपूर आणि नाशिक पालिका क्षेत्रांपर्यंत त्याचा विस्तार वाढवण्यात आला.
ही प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्षापासून आता संपूर्ण राज्यात राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रक्रियेत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक शाखानिहाय तुकड्या, अनुदानित-विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाखानिहाय प्रवेश क्षमता, उपलब्ध विषय आदी अद्ययावत माहिती सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक हे शिक्षण संचालकांनी निश्चित केलेल्या ऑनलाइन सेवा पुरवठादारास उपलब्ध करतील. राज्यस्तरावर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांना ही प्रक्रिया समजावी, यासाठी त्याची जनजागृती करावी, तसेच आवश्यकता असल्यास त्याविषयी प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचनाही राज्य सरकारने केली आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील 10 वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जो राज्य सरकारने घेतलेला आहे या निर्णयाशी आपण सहमत आहात का? त्याचप्रमाणे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा