SSC HSC result website आज आपण पाहणार की दहावी बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये आता कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत त्याचप्रमाणे कोणत्या बोर्डाचा निकाल आहे विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे आणि निकाल कशाप्रकारे आपण पाहायचा आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
SSC HSC result website संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे बोर्ड असतात तुम्हाला माहित असेल जसं की स्टेट बोर्ड सीबीएससी बोर्ड आय सी बोर्ड केंब्रिज बोर्ड असतात परंतु या बोर्डच्या परीक्षा वेगवेगळ्या प्रमाणे घेतल्या जातात तारीख देखील वेगळे असते आणि निकालाची तारीख देखील वेगळी असते आता महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल कधी जाहीर होणार आहे आणि त्याचप्रमाणे कोणत्या बोटाचा निकाल जाहीर झालेला आहे याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत
३० एप्रिल रोजी ICSE (दहावी) आणि ISC (बारावी) बोर्ड परीक्षांचे निकाल सकाळी ११ वाजता जाहीर केले. यंदा दोन्ही निकाल एकाच वेळी घोषित करण्यात आले. परीक्षांचे एकूण निकाल अत्यंत उत्साहवर्धक असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.६४% तर मुलींचे ९९.४५% इतके आहे.
निकाल परिषदेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर cisce.org प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार आपली गुणपत्रिका वेबसाइटवरून थेट डाउनलोड करू शकतात. यासाठी परीक्षा रोल नंबर आणि रोल कोड आवश्यक आहे. तसेच, डिजिलॉकर अॅपचा वापर करूनही मार्कशीट सहज मिळवता येईल.
निकाल कसा पाहाल?
results.digilocker.gov.in या वेबसाइटला भेट द्या
CISCE निकाल विभाग निवडा
वर्ग निवडा आणि निकाल बटणावर क्लिक करा
इंडेक्स क्रमांक, युनिक आयडी आणि जन्मतारीख भरा
सबमिट करताच निकाल दिसेल
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी इंटरनेटशिवाय एसएमएसचा पर्यायही उपलब्ध आहे. ISC निकालासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी लिहून 09248082883 या क्रमांकावर पाठवावा. काही क्षणांतच विषयानुसार गुणांचा तपशील मिळेल.
ज्यांना त्यांच्या निकालांबाबत समाधान नसेल, त्यांनी जुलै २०२५ मध्ये कोणत्याही दोन विषयांची सुधारणा परीक्षा देता येईल. पुनर्मूल्यांकनासाठीही अर्ज करता येणार असून, यासाठी cisce.org या वेबसाइटवरील ‘Public Services’ विभागात जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
ISC (बारावी) परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान झाली होती, तर ICSE (दहावी) परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत झाली. बारावीला १.०६ लाख आणि दहावीला २.५३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकालानंतर आता पुढील टप्प्यांवर विद्यार्थी आपले शैक्षणिक निर्णय घेणार आहेत.
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे निकालाची प्रतीक्षा आणखीन आहे परंतु या आपल्याला माहितीनुसार दहावी बारावीच्या बोर्डाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे जवळपास बारावीचा निकाल 15 मे पर्यंत लागू शकतो आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागू शकतो.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी-बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा