SSC HSC result rule 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत यातच आता बोर्डाचा एक नियम आहे यामुळे आता सर्व विद्यार्थी पास होणार आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयात किती मार्क मिळावे लागतील त्याचप्रमाणे या नियमाची पूर्ण माहिती आणि हा नियम कोणाला लागू होतो याची देखील संपूर्ण माहिती आपण पाहूयात
SSC HSC result rule 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत या संदर्भात आता बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी दिलासादायक आनंदाची बातमी आहे बोर्डाचा एक नियम आहे त्याचं नाव आहे कम्बाईन पासिंग रूल या पासिंग रोलनुसार बोर्डाचे विद्यार्थी सहजरित्या आपल्या परीक्षेत पास होऊ शकतात आणि चांगले टक्के मिळू शकतात याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
राज्यातील परीक्षा कशा होणार
यावर्षी राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान हे राबविण्यात येणार आहे आणि राबवले जात आहेत यानुसार प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बंधनकारक आहे पोलिसांचे लक्ष आहे ड्रोन कॅमेरा आहेत बैठक पथक आहे भरारी प्रथक आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना यावर्षी जरा अभ्यासावर भर द्यावे लागेल तुम्ही पहाच तर सहज होतात कारण बोर्डाचा एक नियम देखील आहे तो आपण पाहूयात
बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या २० गुणांमुळे (प्रत्येक विषयांसाठी) विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रानुसार पास होणे काहीच अवघड नाही. पण, टक्केवारी जास्त मिळविण्यासाठी त्यांनी पाठांतरापेक्षा स्वतः नोट्स काढणे, उत्तरे वेळेत लिहिण्याचा सराव करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून अभ्यास, मनावर दडपण तथा भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे आणि परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोचणे, या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितपणे चांगला फायदा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक संघाने व्यक्त केला आहे.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेत सरमिसळ पद्धत असणार आहे. एकाच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील. काही केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक दुसऱ्या शाळांमधील अनोळखी असतील. परीक्षा केंद्राबाहेर बैठे पथक असेल व काहीवेळा भरारी पथकांच्या देखील भेटी होतील. त्यामुळे कोणीही गैरमार्गाचा अवलंब न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.
विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात झालेल्या पूर्व वर परीक्षेतील चुका, कमतरता दूर करून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेत पास होणे फार अवघड राहिलेले नाही, त्यामुळे सर्वांनीच टक्केवारी जास्त कधी पडेल, यासाठी मन प्रसन्न ठेवून अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बोर्डाच्या या नियमामुळे मुल पास होणार
अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी
बारावीच्या परीक्षेत देखील आता तुम्ही प्रत्येक विषयात 30 गुण हे प्रॅक्टिकल विषयाचे असतात आणि 70 मार्कांचा हा लेखी पेपर असतो त्यामुळे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅच असेल किंवा बायोलॉजी असेल यामध्ये तुम्हाला 30 प्रक्रिया मार्कांपैकी जर 25मार्क पडले तर तुम्हाला फक्त आणि फक्त थेरी पार्कमध्ये दहा गुण मिळवावे लागतात आणि तुम्ही 35 मार्क घेऊन सहजरित्या पास होऊ शकतात
विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची देखील व्यवस्था
दहावी बारावी बोर्डाचा रिझल्ट लागल्यानंतर काही मुलांच्या पदरी जर अपयशाला असेल तरी त्यांना लगेच एका महिन्याभरात पुरवणी परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेचा वापर करून तुम्ही परत विषयांची परीक्षा देऊन पास होऊ शकतात यामुळे तुम्हाला तुमचं वर्ष वाया जात नाही आणि तुम्ही शिक्षण प्रवाहामध्ये राहत असतात..
अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या कोणत्या नियमामुळे दहावी बारावी बोर्डाचे विद्यार्थी हे पास होणार आहे दहावी बारावी बोर्डाच्या सर्व उपयुक्त नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.