Maharashtra 10th 12th exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकीट मध्ये काही महत्त्वाचा बदल झाला आहे का याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत दहावी बारावीच्या बोर्डाच्या हॉल तिकीट मध्ये आधी देखील एक महत्त्वाचा बदल झाला होता आता परीक्षेच्या तोंडावर एक आणखीन एक काही गोंधळ पाहायला मिळत आहे याची माहिती आपण घेऊयात
Maharashtra 10th 12th exam 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अवघ्या दोन दिवसात आलेले आहेत यामध्ये स्वतः हॉल तिकीट मध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे कारण आता हॉल तिकीट मध्ये काही विषयांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही मुलांचे हॉल तिकीट मध्ये मोठी चूक झालेली आहे त्यामुळे आता बोर्डाला मोठी परत एकदा हॉल तिकीट प्रिंट करावी लागतील कारण वर्षभर एका विषयाचा अभ्यास केलेला आहे आणि दुसऱ्याच विषयाचा हॉल तिकीट वर नाव आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे तुमच्या बाबतीत देखील असे झाले का हॉल तिकीट नक्की एकदा पहा
Maharashtra 10th 12th exam 2025: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा राज्यात परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३५ हजारांनी वाढली आहे. दहावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १९ हजारांनी तर बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १७ हजारांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले आहे.
परंतु आता या हॉल तिकिटांवरील गोंधळ समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेला विषय हॉल तिकिटावर आला नाही. त्याऐवजी दुसराच विषय हॉल तिकिटावर आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. यासंदर्भात कोल्हापूरमधील पालक महाविद्यालयात पोहचले असून प्रशासनाला जाब विचारत आहे.
महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहेत. परंतु परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील पालक विमला गोयंका महाविद्यालयात पोहचले आहेत. पालकांनी यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारला आहे. एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला आहे.
शिकला एक विषय आला हॉल तिकीट वर दुसरा विषय.
विद्यार्थी बारावीत जो विषय शिकले. ज्या विषयाचा अभ्यास केला, तो विषय हॉल तिकिटावर दिलेला नाही. वर्षभर दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. परीक्षेच्या तोंडावर हॉल तिकिटांवर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पालक अन् विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे.
राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवणार
यावर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या परीक्षा या कॉफी मुक्त होण्यासाठी राज्यभरात कॉफी मुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येणार आहे या अंतर्गत विद्यार्थी पालकांमध्ये समाजामध्ये जनजागृती होणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर हे सीसीटीव्ही बंधनकारक आहे परिसरामध्ये 144 कलम लागू आहे त्याचप्रमाणे कोणी गुन्हेगार आढळल्यास त्याला फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना घेता अभ्यास करावा आपल्या स्वतःवर विश्वास ठेवावा.
हॉल तिकीट असे करा डाऊलोड
mahahsscboard च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Hall Ticket सेक्शनमध्ये जा.
रजिस्ट्रेशन डिटेल्ससह आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
एचएससी २०२५ परीक्षेसाठी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाउनलोड करा.
हॉल तिकिटाची प्रिंट घ्या आणि त्यावर मुख्याध्यापकांची सही व शाळेचा स्टॅम्प घ्या.
कॉपीमुक्तीसाठी प्रशासन सज्ज
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या. परीक्षा दरम्यान 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहण्याचे आदेश दिले आहे. नियमांची उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सहआरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले.
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावीच्या काही मुलांच्या हॉल तिकीट मध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात याचे संपूर्ण माहिती बघितली दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी नक्कीच 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.