WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result date 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बोनस 10गुण मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result date 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बोनस दहा गुण मिळणार आहेत हे दहा गुण कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतील कशाप्रकारे मिळतील कोणत्या योजनेमुळे मिळतील आणि या गुणपद्धतीत आपल्याला सहभाग कसा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या टक्केवारी वाढेल आणि हे दहा गुण आपल्याला कसे मिळतील याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहूयात.

SSC HSC result date 2025 पूर्ण माहिती

राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत जवळपास 35 ते 36 लाख विद्यार्थ्यांनी या बोर्डाच्या परीक्षा दिलेल्या आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हे निकालाकडे आहे निकाल देखील यावर्षी लवकर लागणार आहे पुरवणी परीक्षा देखील लवकर होणार आहे प्रवेश प्रक्रिया देखील लवकर होणार आहे यामध्येच आता एक मोठी बातमी समोर येत आहे आपल्याला दहा गुण कसे मिळतील ज्यामुळे आपल्या टक्केवारीची वार होईल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज या लेखनात पाहणार आहोत.

SSC HSC result date 2025 राज्यातील साक्षतेचे प्रमाण वाढवण्यासाठी, तसेच केंद्र सरकारने साक्षरतेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपयायोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी किमान पाच निरक्षर यांना साक्षर केल्यास त्यांना जादा गुण देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शिक्षण संचालनालय (योजना) यांच्यावतीने राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सादर करण्यात आलेला आहे.

त्यावर आता शिक्षण मंडळलाकडून शिक्कामोहर्तब झाल्यावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी पाच निरक्षर यांना साक्षर केल्यास त्यांना जादाचे पाच ग्रेस गुण मिळणार आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेत कला, चित्रकला, क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह एनसीसी, स्काऊट व गाईडमधील सहभागाबद्दल सवलतीचे गुण दिले जातात.

याच धर्तीवर यात ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमात सहभागाबद्दल ही सवलतीचे गुण देण्याचा विचार पुढे आल्यानंतर विधानसभा निवडणूकांपूर्वी शिक्षण संचालनलय (योजना) पुणे यांच्यावतीने तसा प्रस्ताव तयार करून तो शिक्षण मंडळ (एसएसीबोर्ड) यांना सादर करण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होवून सारक्षता कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना साक्षरतेच्या कामगिरीवर आधारीत 1 ते 5 गुण देण्यात येणार आहेत.

साक्षरता मोहिमेत निरक्षरांना पहिल्या टप्यात लेखन, वाचन, संख्याज्ञान यासह जीवन कौशल्य विकास आणि आर्थिक, कायदे विषयक साक्षरता, मुलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्य प्राप्ती याबाबत शिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षक गावात सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतात आणि त्या निरक्षरांना साक्षर करण्याचे काम विद्यार्थी स्वयंसेवक करतील. या कामासाठी दहावी, बारावीच्या मुलांना सवलतीचे गुण दिल्यास त्याचे साक्षरतेचे कामात 100 टक्के सहभाग मिळेल आणि पालकही सहभागी होतील, अशी अपेक्षा शिक्षण विभागाची आहे.

या विषयावर शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी संमती दर्शवली होती. त्यांनी याबाबत शिक्षण विभागाल सुचना देखील दिल्या होत्या. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि हा विषय काहीसा बाजूला गेला. मात्र, दरम्यानच्या काळात शिक्षण संचालनालय यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सादर केलेला आहे. त्यावर निर्णय आता मंडळ घेणार असल्याचे सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले आहे

शिक्षकांचा बहिष्कारावर उपाय
राज्यात शिक्षण संचालनालय योजना कार्यालयाकडून ‘नवभारत साक्षरता’ उपक्रमासह 39 योजना, उपक्रम राबविले जातात. साक्षरता उपक्रमात शिक्षकांचा प्रतिसाद नगण्य आहे. शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने निश्चित उद्दिष्ट साध्य होणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये निरक्षरांची संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता नाही. त्यातच दरवर्षी नवभारत साक्षरता कार्यक्रमावर राज्यातील शिक्षक संघटना या बहिष्कार टाकत हे काम न करण्याचा इशारा देत आहेत. यामुळे नवभारत साक्षरता कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी शिक्षण संचालनालय यांनी हा उपाय शोधला आहे.

असे मिळणार 10 गुण
दहावी, बारावी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांसह आता निरक्षरांना साक्षर करण्यासाठीही सवलतीचे गुण मिळण्याची शक्यता आहे. यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षरांना साक्षर केले, तर पाच गुण मिळतील. यात संबंधीत विद्यार्थ्यांनी एक निरक्षर साक्षर केल्यास एक गुण, दोन साक्षर केल्यास दोन याप्रमाणे पाच साक्षर केल्यास पाच गुण, तसेच पाचपेक्षा अधिक साक्षर केल्यास मात्र पाचच गुण मिळणार असल्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाला सादर केलेला आहे.

त्याचप्रमाणे तुम्हाला कला क्षेत्र यामध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल तर तुम्हाला कलाक्षेत्र क्रीडा याच्यातील पाच गुण असे आणि साक्षर अभियानाचे पाच गुण असे मिळून एखाद्या विद्यार्थ्याला दहा गुण घेऊन मिळू शकतात या दहा गुणांसाठी सर्वस्वी तुम्हाला साक्षरता अभियान करावे लागेल आणि शाळेत क्रीडा कला क्षेत्रात तुम्हाला सहभाग घेणे आवश्यक आहे.

2011 मधील जनगणनेनुसार राज्यभरात 1 कोटी 62 लाखांपेक्षा अधिक निरक्षर असल्याचे सांगण्यात येते. केंद्र सरकारच्या उद्दिष्टानूसार 2030 पर्यंत सर्वांना साक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता मोहिमे अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने उपक्रम अडखळत सुरु आहे. आता त्यात काम करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभाग ‘सवलतीचे गुण’ यावर विचार करत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे नुकताच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आता तो राज्य सरकारकडे जाईल. आणि धोरणात्मक निर्णय.
डॉ. महेश पालकर, संचालक, महाराष्ट्र शिक्षण

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहा गुण कसे मिळतील याविषयी आपण माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment