WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ssc hsc gunptrak दहावी बारावीचे मूळ गुणपत्रक विद्यार्थ्यांना या तारखेला मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ssc hsc gunptrak आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. दहावी बारावीचा रिझल्ट हा निकाल जाहीर झालेला आहे त्यामुळे राज्यातील दहावी आणि बारावीचा बोर्डाचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेला आहे परंतु तो आता आपल्याला मूळ गुणपत्रक म्हणजेच निकाल शाळा कॉलेजमध्ये कधी मिळेल याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.

Ssc hsc gunptrak संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होताच आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तो निकाल बघितलेला असतो परंतु तो आपल्याला ऑफलाइन पद्धतीने आत्ताच मूळ ओरिजनल निकाल जो आहे तो आता मुलांना विद्यार्थ्यांना कधी मिळेल शाळा आणि कॉलेजमध्ये याचे प्रतीक्षा लागलेली असते सरासरी कुठलाही निकाल लागल्यानंतर आठ दिवसांमध्ये आपल्याला तो निकाल शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळतो तर आपण बघूयात की मूळ निकाल आपल्याला कधी मिळेल कारण त्यामुळे घेऊन आपण पुढील ऍडमिशन प्रोसेस करत असतो बघूया

Ssc hsc gunptrak महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळाने या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. हा निकाल ऑनलाईन होता. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये गुणपत्रक मिळणार आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातील विद्यार्थ्यांना १६ मे पासून गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात मिळणार आहे.

बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६.७४ टक्के लागला होता. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के राहिला.

बारावीच्या परीक्षेत सर्व विभागीय मंडळातून यंदाही मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त राहिली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाही मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती.

सन 2024-25 मध्ये बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासात प्रथमच बारावीचा निकल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला. परंतु यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के राहिला आहे. यंदा निकालाची टक्केवारी 1.49 टक्क्यांनी कमी आहे.

दहावीचा निकाल जाहीर
दरम्यान, 13 मे रोजी बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. या निकालातही मुलांपेक्षा मुलींच आघाडीवर राहिल्या. ९६.१४ टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे. दहावीच्या निकालात लातूर बोर्डातील ११३ विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले. त्यामुळे लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

दहावीचे मूळ गुणपत्रक आता कालच निकाल लागलेला आहे त्यामुळे आता मूळ गुणपत्रक हे साधारणतः आठ दिवसांमध्ये शाळेत मिळेल

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रक कधी मिळणार याविषयी आपण माहिती पाहिली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment