SSC HSC exam study tips 2025 आजकाल आपण पाहतात की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत यामध्ये विद्यार्थी पालक भरपूर टेन्शन घेत असतात यामध्ये विद्यार्थ्यांना काही गोष्टी आणि पालकांनी देखील काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत त्यामुळे विद्यार्थ्यांवर येणारा परीक्षेचा ताण हा कमी होऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.
SSC HSC exam study tips 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा राज्यभरात सुरू झालेले आहेत या परीक्षा आता भरपूर सखोल आणि खूपच सुरळीत चालू आहे यामध्ये विद्यार्थी पालकांना भरपूर टेन्शन आलेला असतं खास करून विद्यार्थ्यांपेक्षा पालख जास्त चिंतत असतात तर यासाठीच आपण आज बघणार आहोत की पालकांनी विद्यार्थ्यांचा टेन्शन आणि ताण कसं कमी करायचं त्यामुळे त्यांचे पेपर हे सोपे आणि आनंदीत जातील याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत
आनंदी पणाने अभ्यास करा आणि निश्चित रहा
कुठलाही अभ्यास करताना आपण विषय जो असेल तो निवडा व्यवस्थित आपला नियोजन करा आणि तणावग्रस्त अभ्यास करा. तणावग्रस्त अभ्यास केल्याने आपल्याला तो व्यवस्थित लक्षात राहतो परंतु आपण चिंतेत जर अभ्यास केला आणि आपला अभ्यास जरी झाला असेल तरी आपल्याला तो स्मरण होत नसतो त्यामुळे आपण आनंदीत आणि फ्रेशनेस होऊन अभ्यास केला पाहिजे पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर जास्त दबाव नाही टाकला पाहिजे
SSC HSC exam study tips 2025स्वतःच्या परीक्षेत आलं नसेल एवढं टेंशन मुलांच्या परीक्षांवेळी पालक घेतात. फक्त टेंशन घेत नाहीत तर मुलांना देतातही.पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती नाजुक मन चिरडली जातात. तिथूनच कळत नकळत नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरवात होते. मुलांना मानसिक ताण येतो. त्याचं योग्य निर्मूलनही केलं जात नाही. अपयशाच्या भीतीने मुलं मग प्रयत्नच सोडून देतात. मान्य आहे पालकांच्या भावना चांगल्याच असतात. पण मुलांच्या भावनांचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. पालकांनी काही गोष्टी पाल्यांशी बोलताना लक्षात ठेवायला हव्यात.
पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजकाल मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. पिढी बदलली की पालनपोषणाची पद्धतही बदलते. त्यानुसारच पालकांना वागायला हवे. मुलांना मानसिक शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लक्षात ठेवा की, परीक्षा हा आयुष्यातला अत्यंत गरजेचा भाग आहे. पण तो भागच आहे अख्ख आयुष्य नाही.
1)पाल्याची तुलना इतर मुलांशी करू नका. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. तुलनेमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ते स्वतःला कमी लेखायला लागतात
२. त्यांना न येणार्या विषयांवरून सतत ऐकवू नका. त्यांना ते समजावण्यासाठी मार्ग शोधा. ज्या विषयात ते चांगले आहेत, त्याचे कौतुक करा. त्याच्या गुणांबद्दल त्यांना जाणीव करून द्या.
३. त्यांच्या झोपेची नीट काळजी घ्या. एक दिनचर्या आखून घ्या. परीक्षा संपेपर्यंत ती पाळा. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा चांगला नाही.
४. तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. मुलांना स्वतःहून चांगले मार्क मिळवण्याची इच्छा निर्माण होईल. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेला अभ्यास भीतीपोटी केलेला असेल, ज्याला काहीच अर्थ नाही.
५. त्यांना सतत तुमच्या पाठिंब्याची जाणीव करून द्या. त्यांच्या यशात तसेच अपयशातही तुम्ही त्यांच्या बरोबर आहात, हे पालकांच्या वागण्यातून मुलांना जाणवणे गरजेचे आहे
६. त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या. पालक बरेचदा मुलांच्या समस्यांना नाटकं किंवा टाळाटाळ समजतात, आई-बाबा ऐकतचं नाहीत म्हणून मग मुलं त्याच्याशी संवाद साधणंच सोडून देतात. पालकांबद्दल गैरसमज त्यांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे मुलांना परीक्षेत काय समस्या येतात ते ऐकून घ्या.
७. परीक्षेच्या दिवसांत पालक मुलांना आवडीचे अरबट चरबट खायला देतात. जेणेकरून ते अभ्यास करतील. तसे न करता, पाल्याच्या आहाराची काळजी घ्या. आजरपण येणार नाही असेच पदार्थ खायला द्या.
८. मुलांना लालसा दाखवून मार्क मिळवायला सांगू नका. ९० टक्के मिळवलेस तर सायकल घेईन या प्रकारच्या कृती पालक करतात. जे अत्यंत चुकीचे आहे. मुलांकडून कधीच लालसेपोटी अभ्यास करुन घेऊ नये.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पालकांचा देखील रोल किती महत्त्वाचा आहे पालकांनी जास्त विद्यार्थ्यांना फोर्स करू नये आणि आनंदी वातावरणात त्यांना परीक्षा कशा देता येतील याची वातावरण निर्मिती आपल्या घरात करावी दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी आणि बोर्डाचे पेपर सोपे होण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करा.