WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC Chemistry IMP 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत एवढ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC Chemistry IMP 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता बोर्डाच्या परीक्षांमध्ये किती विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलेला आहे किती विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC Chemistry IMP 2025 पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. जवळपास बोर्डाच्या परीक्षांमध्ये काही गैरप्रकार सुरू आहेत राज्यात कॉपीमुक्त अभियान करण्यात आले होते परंतु ते काय एवढे यशस्वी झालेले नाहीयेत कारण भरपूर ठिकाणी काही कॉफीचे गैरप्रकार या आढळण्यात आलेले आहे गोंदिया तचक भौतिकशास्त्राचा पेपर हा लीक झाल्याची बातमी देखील समोर येत आहे त्यामुळे आता किती विद्यार्थ्यांवर हे गुन्हा दाखल झालेला आहे त्याचे संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा चालू असून आतापर्यंत झालेल्या पाच विषयांच्या पेपरला छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १०४ गैरप्रकार करताना पकडले आहे. कॉपी मुक्त अभियानाची जनजागृतीचा परिणाम या विभागात झालेला नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी भौतिकशास्त्र व तर्कशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकूण ७४ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले. त्यातील सर्वाधिक ५७ विद्यार्थी हे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत.

राज्यभरातील ३ हजार ३७३ मुख्य केंद्रांवर ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली, ३७तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गेल्या ११ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारीदरम्यान इंग्रजीसह भाषा विषयाच्या पेपरला सामोरे जावे लागले आहे. इंग्रजी विषय सोडला तर अन्य पेपरला इतके गैरप्रकार झालेले नाहीत. राज्यभरातून इंग्रजी विषयाच्या पेपरला ४२ जणांना पकडले.

त्यामध्ये २६ विद्यार्थी छ. संभाजीनगरमधील होते. हिंदीच्या पेपरला राज्यात १६ विद्यार्थी सापडले. यामध्ये १३ हे छत्रपती संभाजीनगरमधील होते, मराठीसह अन्य भाषांच्या पेपरला ८ तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रमाच्या पेपरला ८ अशा ७४ एकूण कॉपीबहाद्दरांवर राज्य मंडळाने कारवाई केली. यापैकी ४७विद्यार्थी हे संभाजीनगरमधील होते. सोमवारी झालेल्या पेपरला तर कहरच झालेला आहे. संभाजीनगर विभागातील ५७ विद्यार्थी सापडले आहेत. यामध्ये पुणे विभागात ७, नागपूर विभागात १, मुंबई विभागात या पेपरला पहिल्यांदाच खाते उघडले आहे. १ डमी विद्यार्थी सापडला आहे. तर अमरावती विभागातील ३, नाशिक विभागात १, लातूर विभागात ४, असे विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले.

खरी कसोटी आणखीन बाकी

मंडळाची खरी कसोटी या आठवड्यात असून, विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रनंतर आता रसायनशास्त्र, गणित अशा विषयांच्या पेपरला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे मंडळाला अधिक लक्ष छत्रपती संभाजीनगर विभागात द्यावे लागणार आहे. राज्य मंडळाने यंदा केलेल्या कडक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास चांगलाच अटकाव बसला असला तरी यामध्ये छत्रपती संभाजीनगर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. इथून पुढे होत असलेल्या अवघड विषयांच्या पेप-रसाठी विद्यार्थ्यांना तर पेपर सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य मंडळाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळातर्फे गैरमार्गाविरोधात लढा अर्थात कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. मात्र, गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी कमी होताना दिसत नसल्याचे आढळून आले आहे. सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यात पुणे विभागात 7, नागपूर विभागात 1, छत्रपती संभाजी नगर विभागात 57, मुंबई विभागात 1 अमरावती विभागातील 3,नाशिक विभागात 1, लातूर विभागात 4, असे एकूण 74 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील किती विद्यार्थ्यांवर किती विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॉपी प्रकरणांमध्ये कारवाई झाली आहे याची पूर्ण माहिती पाहिली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी तुम्ही 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment