WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board rules 2025 दहावी बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे नवीन नियम विद्यार्थ्यांची चिंता वाढली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board rules 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यामध्ये आता बोर्डाचे काही नवीन नियम आलेले आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे

SSC HSC board rules 2025 पूर्ण माहिती


दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यावर्षी ठरवलेला आहे की यावर्षीच्या परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त होण्यासाठी काही कठोर पावलं उचललेले आहेत यामध्ये आता बोर्डाने आणखीन एक नवीन नियम काढलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची चींता वाढलेले आहेत त्याचीच आपण पूर्ण माहिती बघणार आहोत विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे यावर्षी परीक्षा द्यायच्या आहेत काही बोर्डाची निर्णय चुकीचे झाले होते ते देखील आता परत घेण्यात आलेले आहेत

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही असणार

प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणार्‍यांवर ड्रोन कॅमेर्‍यांचा वॉच असेल. ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल, त्या शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला आहे.

10 वी व 12 वीची बोर्ड परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे आदी उपस्थित होते. दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12 वीचे पेपर होतील. दि.21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10 वीचे पेपर होतील.

गणित व इंग्रजीच्या पेपरला बैठे पथक

गणित व इंग्रजीच्या पेपरसाठी गटशिक्षणाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक असेल. सर्व तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी व इतर विभाग

प्रमुख तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देतील. केंद्र स्तरावरही एक दक्षता पथक तयार करण्याचे आदेश आहेत. परीक्षा केंद्राच्या परीसरात कलम 144 लागू केले जाणार आहे.

त्या’ केंद्रांवर बाहेरील पर्यवेक्षक

मागील 5 वर्षाच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्‍या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्‍यांमधून करण्यात येणार आहे, परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे.

कशी असेल पथकांची रचना

एकूण सात भरारी पथके असणार आहेत. जिल्हाधिकारी, डाएटचे प्राचार्य, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजनेचे शिक्षणाधिकारी, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकारी यांचे, असे सात पथके असणार आहेत. प्रत्येक पथकात तीन सदस्यांचा समावेश असेल. त्यात एक महिला असणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमावली जाहीर

संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरे.

गैरप्रकारात सहभागी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द.

गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द

परीक्षा केंद्रांचे पथकामार्फत वेबकास्टींग मॉनिटरींग

परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे दोन स्तर

मोबाईल अँपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वॉच

सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असणार

जिल्हा आणि तालुकास्तरावरुन विशेष भरारी पथक

संवेदनशिल केंद्रावर जास्त बंदोबस्त

राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाने काही नवीन नियम मांडलले याची पूर्ण माहिती आपण पाहिली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment