SSC HSC board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत या संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बोर्डाचा पेपर हा फुटलेला आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्यासमोर येत आहे हा पेपर फुटला आहे कुठल्या जिल्ह्यात हा पेपर फुटला आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत
SSC HSC board paper 2025 पूर्ण माहिती राज्यभर दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता परीक्षा केंद्र सुरू असताना परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कारण बंधनकारक करण्यात आलेले आहेत यामुळे परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारची कॉपी होऊ नये यामुळे प्रत्येक ठिकाणी सूचित त्याचप्रमाणे शिक्षकांची अदलाबदली आणि ज्या ठिकाणी काही गैरप्रकार होईल त्या ठिकाणी शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल अशा प्रकारे बोर्डाने सांगितले आहे 144 कलम लागू झालेले आहेत फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे असं भरपूर काही बोर्डाने सांगितलं परंतु हे सर्व आता काही सपशेल खोटं होतं आणि दिसत आहे याच्यात बारावी बोर्डाचा पेपर फुटलेला आहे.
कॉफी मुक्त अभियानाचा उडला धुवा
कॉपीमुक्त अभियानासाठी सध्या महाराष्ट्र सरकारसह जिल्हा यंत्रणा सुद्धा सज्ज असताना अनेक ठिकाणी बैठे पथक हे काम करीत आहेत. जेणेकरून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी. परंतू या योजनेला कुठेतरी खो देण्याचे काम गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका बारावीच्या परीक्षा केंद्रावर (Maharastra 12th Physics paper leaked) सोमवारी बारावी भौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न-उत्तरांची झेरॉक्स प्रत हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे
गोंदिया जिल्ह्यातील या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरात शाळेत एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा? व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स, सेंटरवरून केंद्रावर आली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, या प्रकरणात जेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संपर्क केल्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
बोर्डाच्या परीक्षा दरम्यान विद्यार्थ्याला अटक
१२ वी परिक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया ‘विद्यार्थ्याला’ पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. अहमद खान असे या तोतया विद्यार्थ्याचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एका परिक्षा केंद्रात हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या अरबाझ कुरेशी या विद्यार्थ्यासाठी तो परिक्षा देण्यासाठी आला होता तो राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा अंबरनाथशहर प्रमुख आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. अंबरनाथ शहरातील काही तोतया विद्यार्थी नालासोपारा येथील परिक्षा केंद्रावर परिक्षा देण्यासाठी येत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी त्यांनी संशयित विद्यार्थ्याचा पाठलाग केला.
हा विद्यार्थी पेल्हार येथील ओम साई छाया ज्युनिअर कॉलेज मधील परिक्षा केंद्रावर आला. कार्यकर्त्यांनी त्याची माहिती परिक्षा केंद्र प्रमुखांना दिली. हा तरुण तोतया असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव अहमद खान असून तो अरबाझ कुरेशी या विद्यार्थ्यांचा पेपर सोडविण्यासाठी आला होता. याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी बोर्डाचा पेपर फुटला होता याची पूर्ण माहिती आपण घेतली आहे अशा सर्व अपडेट साठी आमच्या whatsapp अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा