SSC HSC board hallticket 2025 पूर्ण माहिती
SSC HSC board hallticket 2025आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेले आहेत त्यात सुद्धा बारावीचे हॉल तिकीट आलेले आहेत एकच डाऊनलोड करायचे याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ( हॉल तिकीटे) शुक्रवारपासून आजपासून (ता. १०) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
SSC HSC board hallticket 2025 काय असेल प्रोसेस
सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in ‘ या संकेतस्थळावरून शुकवारपासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.
या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
ऑनलाईन मिळणार SSC HSC board hallticket 2025
फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये यांना बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक,प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
दरम्यान, ‘पेड’ असे स्टेटस प्राप्त झालेल्यांचीच प्रवेशपत्रे ‘पेड स्टेटस ऍडमिट कार्ड’ या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील. तसेच, अतिविलंबाने अर्ज भरलेल्या आणि विभागीय मंडळामार्फत जादा आसन क्रमांक (एक्सट्रा सीट नंबर ऍडमिट कार्ड) असे दिलेल्या विद्यार्थ्यांची त्याच पर्यायाद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
SSC HSC board hallticket 2025 काय चूक झाली असल्यास
त्याचप्रमाणे प्रवेशपत्रामध्ये नाव,आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने करायाच्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी संबंधित लिंकद्वारे दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात. विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारीत प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
विषय आणि माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
SSC HSC board hallticket 2025 हॉल तिकीट हरवल्यास
तसेच, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असा शेरा देऊन विद्यार्थांना प्रवेशपत्र देण्यात यावीत, अशा सूचना कुलाळ यांनी प्रकटनाद्वारे दिल्या आहेत.
वरील लेखनात आपण या हॉल तिकीट संदर्भात सर्व माहिती घेतलेली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..