SSC HSC board exam आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत परंतु बोर्डाच्या परीक्षा या अडचणीत सापडलेल्या आहेत कारण एक नवीन वाद निर्माण झालेला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात काही बदल होईल का आणि हा वाद कशामुळे झालेला आहे याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC HSC board exam दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वप्रथम हॉल तिकीट मध्ये एक वाद झाला होता हॉल तिकीट मध्ये विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता यावर सर्वांनी विरोध दर्शवला आणि त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या निर्णयाला समितीत नव्याने हॉल तिकीट जारी केले त्यामुळे हा वाद मिटत असताना आता दुसरा वाद निर्माण झालेला आहे
राज्यात परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने घेतला मोठा निर्णय SSC HSC board exam
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या राज्यात सुरळीतपणे आणि कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मोठा निर्णय घेतला होता यानुसार राज्यातील ज्या शाळा आहेत त्या केंद्रावर तेथील शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार नाहीत तर त्या ठिकाणी दुसऱ्या शाळेचे शिक्षक असतील अशा प्रकारचा हा निर्णय होता परंतु हाच निर्णय आता वादक सापडलेला आहे
कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांची शाळा सोडून अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, शिक्षण मंडळाच्या या निर्णयाला काही शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे.
दहावी बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रक बदलणार का,?
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत विद्यार्थी अभ्यास करत आहेत यामध्ये आता हॉल तिकीट वाट सुरू झालता त्याचप्रमाणे आता शिक्षकांनी देखील इंटरनल पर्यवेक्षक जे असतात त्याचा विरोध केलेला आहे बाह्यशिक्षक यंत्रणेला त्यांनी विरोध केलेला आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणार का वेळापत्रक बदलणार का असे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु सध्या तरी अशी काही बातमी येत नाहीये परीक्षा आहे त्यावेळी होऊ शकतात
शिक्षकांचा विरोध SSC HSC board exam
हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार असून यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होईल असा आरोप होत आहे. शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारीपासून तर दहावीची ३ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या परीक्षेच्या तोंडावरच शिक्षण मंडळाने धाडसी निर्णय घेतला आहे
शिक्षक वर्गातून याला विरोध होत आहे. शाळांचे शिक्षक हे त्याच शाळांमध्ये पर्यवेक्षक म्हणून राहिल्यास अनेकदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यास अडचणी येतात असे शिक्षण मंडळाचे निरीक्षण आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून दरवर्षी नवनवीन उपययोजना केल्या जातात. या नवीन निर्णयानुसार एका शाळेतील विद्यार्थ्यांना जर त्याच शाळेत शालांत परीक्षेचे केंद्र मिळाले तर तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्या शाळेत परीक्षेचे पर्यवेक्षण करता येणार नाही.
या शिक्षकांना पर्यवेक्षणासाठी दुसऱ्या शाळेत पाठवले जाणार असल्याचे या निर्णयात म्हटले आहे. यामुळे, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे. या परीक्षेकरिता जे केंद्र असेल तेथे त्याच शाळेचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले जातात. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पद्धतीला छेद पडणार असल्याने या निर्णयाचा शिक्षकांमधून विरोध सुरू झाला आहे.
शिक्षण मंडळाचे अधिकारीही संभ्रमात
या निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. ग्रामीण भागात दोन शाळांमध्ये २० ते ३० किलोमीटरचे अंतर असते. शहरांतही एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठवणे सोपे नाही. जवळपास प्रत्येकच शाळेत त्या शाळांमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळते. या निर्णयामुळे शेकडो शिक्षकांना त्यांच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवावे लागेल. परीक्षेच्या तोंडावर शाळा बदलीची नियोजन करणे आव्हानात्मक असल्याचे मत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनही व्यक्त होते आहे.
बारावी आणि दहावीच्या परीक्षा तोंडावर असताना हे नवीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ पंधरा दिवसांत एका ठिकाणचे कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी पाठविणे शक्य होणार नाही. प्रत्येक केंद्रातील विद्यार्थीसंख्या आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संख्येत फरक असतो. भौतिक सुविधेत तफावत असते.
परीक्षेच्यादरम्यान करावा लागणारा प्रवास यामुळे शिक्षकांचे वेळेचे नियोजन कोलमडणार आहे. आजपर्यंत सर्वच परीक्षा शिक्षकांनी आपल्याच केंद्रात राहून यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. मात्र अचानक मंडळाने शिक्षकांवर गैरविश्वास दाखवून त्यांची केंद्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ही गंभीर बाब आहे. -सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह, शिक्षक भारती
अशाप्रकारे आपण दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा वादात कशामुळे सापडलेले आहेत याची पूर्ण माहिती घेतली दहावी बारावीच्या सर्व नोट्स साठी 9322515123 या क्रमांकावर संपर्क करा.